पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरकारी मदत व दानधर्म. त-हेचे उत्सव पाहण्यांत येत नाहीत. अगदी दूरच्या खेडवळशा भागांत, प्राचीन रोमन लोकांच्या काळांतल्या काही काही धार्मिक उत्सवसंस्कारांचा थोडासा अवशेष, पाहण्यांत येतो. अशांपैकी हल्ली सुद्धा दृष्टीस पडणारा उत्सव, गावाजवळच्या हिरव्यागार मैदानांत एखाद्या कुमारिकेला मे कीन' मे महिन्याची राणी-म्हणून पट्टाभिषेक करितात, तो होय. हा सुरेखसा समारंभ आटपल्यावर त्या राणीचे तरुण दरबारी मंडळ, अथवा सन्मान्य सख्या, पुष्पमाला धारण करून, 'मे पोल' च्या भोंवतीं नृत्यगीतादिकांच्या द्वारे, वसंताच्या पुनरागमनाचा उत्सव आणि पुष्पदेवता 'फ्लोरा' इच्या आराधनेचा समारंभ साजरा करितात. या चाली इंग्लंडांत बहुतेक नामशेषच झाल्या आहेत. आणि यात्रादिक आनंदमहोत्सवाच्या प्रसंगांचा धर्माशी आतां अर्थाअर्थी संबंध उरलेला नाही. मी विलायतेत पुष्कळसा फिरलों व बऱ्याच गोष्टी पाहिल्या. त्यांचा माझ्या मनावर जो काही परिणाम झाला त्यावरून माझी अशी समजूत झाली आहे की, तेथे धार्मिक आचाराची विशेष गडबड नाही. तरी स्वतःची व्यक्तिविषयक जबाबदारी व सामाजिक कर्तव्यपरता, यासंबंधी लोकांमध्ये उत्कट जाणीव स्पष्ट दिसते. मी हिंदुस्थानांतून आलेला, तेव्हां तेथें धर्मविषयक कल्पनेबरोबर तितक्याच महत्त्वाची नैतिककार्यपरतेची जबाबदारी आजकाल दृष्टीस पडत नसल्याने वरील गोष्टीचा माझ्या मनावर विशेष परिणाम झाला. प्राच्य देशांत लोक सत्कर्म १७१