पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. तर तो या संस्थासंबंधाचा. कारण, वृद्ध व गरीब लोकांना दुर्दैव किंवा निरुपाय यामुळे, सार्वजनिक साहाय्य मिळविणे भाग पडते तेव्हां, त्यांचे तेथे संगोपन होते. इंग्लंडांत भीक मागण्याची कायद्याने मनाई आहे, हे प्रसिद्धच आहे. दूरच्या नातेवाइकाकडे कायमचे राहण्याची इकडे चाल नाही. काम करण्याला अशक्त झाल्यावर आप्त इष्टांकडून त्यांची जोपासना होण्याचाही प्रवात नाही. यामुळे ही ' वर्क हौसेस'ची संस्था अगदी अवश्य आहे. त्या संस्था ज्या उद्देशाने स्थापन केल्या जातात, तो उद्देश पूर्णपणे सफल होत आहे. गरीब लोकांच्या संगोपनासंबंधी या सरकारी व्यवस्थेला इतर अनेक त-हेचे खाजगी प्रयत्न व संस्था, यांच्या द्वारेही पुष्कळ मदत होत आहे. त्यांपैकी पुष्कळसे प्रयत्न धार्मिक संस्थांच्या द्वारें होताहेत. तेव्हां त्यांच्याविषयी जास्त लिहिण्यापूर्वी ' इंग्लिश त्रिश्चियानिटी' इंग्रज लोकांचा खिस्ती धर्मा-संबंधाने माझ्या मनावर जो ग्रह झाला, त्याचे दिग्दर्शन करणे इष्ट आहे. हिंदुस्थानांत सणाचे दिवस नियमित ठरलेले आहेत.काही ना कांही धार्मिक उत्सवाशी त्यांचा संबंध असतो. त्याच्यांत मुख्य हेतु पूजा अर्चेचा. गंमत व तमाशे, हे आनुषंगिक. तथापि त्यांच्यामुळेही लोकांचे चित्ताकर्षण होते. स्थानिक देवतेच्या यात्रेला लोक जातात. तेथील मंदिरांत पूजा अर्चा व इतर धार्मिक विधि आटोपल्यावर, लोक यात्रेत भरलेल्या बाजारांत जिनसांची खरेदी करतात व मजा मारतात. इंग्लंडांत अशा