पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरकारी मदत व दानधर्म. ही 'सोसाइटी' वृद्ध माणसांना, त्यांच्या दिनक्रमाचा कंटाळवाणेपणा कमी करण्याकरितां, शिवणकाम व इतर हस्तकौशल्याचे काम करण्याला उत्तेजन देते. अशा कामाचे बरेचसे नमूने तेथे ठेवलेले आहेत. त्यांतून कांही आह्मीं खरेदी केले.. या ठिकाणींच दुसरी एक संस्था आहे. तिच्यांत तीन वर्षांवरच्या पोरक्या मुलांचे संगोपन केले जाते. या मुलांना स्वयंपाकाशिवाय सर्व कामें स्वतःच करण्याला शिकविले जाते. स्वयंपाक मात्र नोकर लोक करितात. ही मुलें योग्य वयाची झाल्यावर, त्यांना धंदा शिकण्यासाठी ' अप्रैटिस् '-उमेदवार -म्हणून, किंवा एखाद्या लष्करी अथवा आरमारसंबंधी शाळेंत,शिकण्याला पाठवितात.त्या संस्थेची 'मेट्रन'-व्यवस्थापक बाई-त्या मुलांशी पुढेही पत्रव्यवहार चालू ठेवते. त्या योगाने त्यांचा या संस्थेशी संबंध कायम राहतो. ती मुले खिस्तमसच्या दिवसांत परत येतात, त्यावेळी, तीच संस्था त्यांना स्वगृहाच्या जागी होते. या संस्थेत दर मुलामागे आठवड्याला सरासरी खर्च साडेसहा ते साडेनऊ शिलिंग लागतो. या संस्थांची व्यवस्था व तेथील रेखलेली टापटीप, यांचा माझ्या मनावर चांगला ठसा उमटला आणि या संस्थांचे कार्य किती काळजीपूर्वक व सत्यनिष्ठेने केले जाते, हे पाहून खरोखर मला फार समाधान वाटले. युरोपांतील सफरीमध्ये एखाद्या गोष्टीचा माझ्या मनावर विशेषसा ठसा उमटला असेल, १६९