पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. दुसऱ्या एका शाखेत वृद्ध व अशक्त लोकांच्या खाण्यापिण्याची व राहण्याची सोय करून, त्यांच्याकडून डॉक्टर सांगतील ती व तितकीच, कमी श्रमाची कामें म्हणजे बशा, कांटे, सुया, वगैरे घासणे, कपडे धुण्याचे यंत्र चालविणे, व त्या संस्थेत लागणारे भाजीपाला व इतर सामान नीट तयार करणे, अशी करविली जातात.आजारी व काम करण्याला अगदीच असमर्थ अशा लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असून या खात्याला एक नवें इस्पितळ जोडलेले आहे. त्यांत १६० बिछाने आहेत, व त्याकडे बारा 'नर्सेस' किंवा दाया नेमलेल्या आहेत. मनाची चलबिचल झालेल्या लोकांना इतरांपासून अलग ठेवतात. त्यांतही ही चलबिचल सौम्य असेल त्यांनाच या संस्थेत ठेवतात. दांडगे, उन्मत्त व त्रासदायक, अशा वेड्यांना ' ल्यूनटिक् असायलम्'-वेड्यांच्या इस्पितळांमध्ये पाठवितात.आणखी एका शाखेमध्ये तीन वर्षांखालच्या मुलांचे संगोपन, त्यांना सुशिक्षित दायांच्या ताब्यात ठेवून करविले जाते. तेथील पाकशाळा व कोठारें, नीट, स्वच्छ व मोठ्या टापटिपीने ठेवलेली आहेत. ती आम्ही पाहिली. नंतर कमेटी व नेहमीच्या सभा यांच्या बैठकीची ' बोर्डरूम ' पाहिली. तसेच तेथील साधेसें ' चापेल '-प्रार्थनामंदिर-व तेथे राहणाऱ्या लोकांकडून आसपासच्या जमीनीत बागबगीच्याचे व शेतीचे काम करविले जाते, त्या जागाही पाहिल्या. दुसरे उपयुक्त काम 'ब्राबेझॉन् सोसाइटी'कडून पुरविले जाते. १६८