पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरकारी मदत व दानधर्म. नष्ट होत चालली आहे. इंग्रज लोकांना स्वावलंबनाचा धडा उपजतच मिळालेला असतो; तसे नसते तर गरीब लोक या संस्थांचा सहज व अधिकाधिक उपयोग करून घेऊ लागते. न्यूटन आबट्ट येथील वर्क हौस हा, अशा संस्थांचा एक बराच चांगला मासला आहे. त्याच्यांत पुरुष, बायका व मुले मिळून ४५० लोकांची सोय आहे. तेथील मोठ्या भोजनशाळेत एकदम २०० पात्रे बसू शकतात. प्रत्येक माणसाला दररोज ठराविक २६ औंस--सुमारे ६५ तोळेअन्न देतात. याचा दर माणशी आठवड्याला पावणेपांच ते साडेसात शिलिंग खर्च पडतो.गरीब लोकांची प्रतवारी लावण्यासाठी या संस्थेत निरनिराळ्या शाखा आहेत. एका मुकरर जागेत रिकामटेकडे व अल्पकाळ बेकार असलेले, अशा लोकांना अन्न व राहण्याला जागा मिळते. पण नेमून दिलेले काम पुरे केल्याशिवाय, त्यांना तेथून निघून जाऊन स्वतंत्रता संपादन करता येत नाही. दगड फोडणे, लांकडे कापणे, अशांतली कामें, त्यांना दिली जातात. येथे लोक स्वतःच्या पोटापुरती मजुरी कमवितील तोंवर, त्यांना पोटाला दिले जात असल्याने, संस्थेच्या या भागाला वर्क हाऊस-रोजगार करण्याची जागा-हे अन्वर्थक नांव देता येईल. ही व्यवस्था उडाणटप्पू फिरत्या लोकांसाठींच योजिलेली आहे. तिच्या योगाने घट्टेकट्टे लोक भीक मागत फिरतात, त्याला आळा पडतो. १६७