पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रास्ताविक अग्रलेख. जीवन व चारित्र्य, याविषयींच मी मुख्यतः चर्चा केली आहे. तरी 'हिंदुस्थानांतून मी थोडे दिवस इंग्लंड सोडून इटाली व स्विट्झरलंड देशांत जाईपर्यंतचे वृत्त पूर्ण करण्यासाठी, व हे लेख साग्र व्हावे ह्मणून, विलायतच्या सफरीमध्ये व लंडनला जातांना वाटेंत फ्रान्स देशांत मिळालेला अनुभव व संस्कार, यांच्या विषयीही प्रथम भागामध्ये वर्णन केले आहे | या पुस्तकाला लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन् यांनी कृपा करून उपोद्घात लिहून देण्याची तसदी घेतली, याबद्दल त्यांचे येथे मी आभार -मानीत आहे. त्यांनी पुष्कळ दिवसपर्यंत हिंदुस्थानच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटचे काम उत्तम तन्हेने केलेलें-अशा या लार्ड साहेबांचा सहवास बडला व त्यांच्याशी हिंदुस्थानाविषयी चर्चा व संभाषण करण्याचा प्रसंग मिळाला हा एक अलभ्य लाभच होय. विलायतेंतील बहुजनसमाजापैकी बहुतेकांना या त्यांच्या प्राच्य साम्राज्यविषयक प्रश्नासंबंधाची माहिती वस्तुतः असंत नाही, ही गोष्ट खरी. तरी सरकारी नात्याने, हल्ली किंवा पूर्वी हिंदुस्थानाशी संबंध असलेल्या इंग्रज लोकांना या प्रश्नासंबंधाने माहिती तंतोतंत असते, हे पाहून आपले मन आश्चर्यचकित झाल्यावांचून रहात नाही. - आणखी एका सद्गृहस्थांचे-सर जॉर्ज बर्डवुड यांचे मनापासून आभार मानणें अवश्य आहे. त्यांच्याशी निकट परिचय होण्याचा प्रसंग आला याचा मला मोठा आनंद वाटला. कारण, माझ्या पूर्ववयांत त्यांचे बंधु न्यायमूर्ती एच्. एम्. बर्डवुड साहेब कांहीं वर्षे मुंबई सरकारचे एक कौन्सिलर होते. त्यांचा व माझा निकट संबंध घडण्याचा बहुमान मला मिळाला होता. सर जॉर्ज यांनी हिंदुस्थान सोडल्याला पुष्कळ वर्षे झाली. तरी त्यांच्या या जन्मभूमीसंबंधी (हिंदुस्थान ही त्यांची जन्मभूमि आहे.) त्यांचे प्रेम व सहानुभुति ही पूर्ववत् जागृत आहेत. हिंदुस्थानांत अलीकडे इतकी चळवळ व मूर्खपणाचे प्रकार घडून आले तरी, आपल्या वृद्धापकाळी आमच्या ब्राह्मणजाती,