पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रास्ताविक अग्रलेख. मुळे, या पुढील लेखांमध्ये वर्णन केलेल्या बऱ्याच दीर्घकालिक अशा युरोपांतील प्रवासाचा मार्ग सुलभ झाला. __ स्वतःच्या प्रवासासंबंधाची टांचणे करून ठेवून परत आल्यावर त्यांच्यावरून आपल्या मंडळीला त्यासंबंधी माहिती देण्याची माझी पूर्वीपासून वहिवाट आहे. माझ्या सर्व सफरींमध्ये ही सफर अधिक विस्ताराची व मनोवेधक होय. तिच्यांत मिळालेली माहिती व अनुभव, पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याला, युरोपामध्ये पुष्कळच साधने आहेत. हे जाणून माझ्या अनेक मित्रांनी हे काम करण्याविषयी मला आग्रह केला. तेव्हां स्वतःविषयी साशंक असूनही मी ते करण्याला कबूल झालो. गडबडीने पृथ्वीपर्यटन करणारे लोक हिंदुस्थानांत येऊन या देशाविषयी आपले अनुभव प्रसिद्ध करणारी पुस्तकें लिहितात, त्यांत यथार्थ वर्णन नेहमीच पाहण्यास सांपडते असे नाही; इतकेच नव्हे, तर अशा पुस्तकांतील चुकांमुळे गैरसमज उत्पन्न होण्यासारखा नसता तर त्या निव्वळ हास्यास्पद सुद्धा वाटल्या असत्या. असली विचित्र उदाहरणे समोर असूनही, अवघ्या सात महिन्यांच्या विलायतच्या प्रवासांत मनावर झालेल्या संस्कारांचे वर्णन पुस्तकरूपाने जनतेपुढे ठेवणे, हे तरी साहसच. वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन करण्यांत मजकडून झालेले प्रमाद व दोष आढळून येतील, त्यांविषयी वाचकांनी गय करावी असें माझें मागणे आहे. यांत दिलेली मते केवळ माझी स्वतःची आहेत. ती प्रतिनिधिपणाने पुढे केलेली नव्हेत हेही लक्षांत . ठेवावे, अशी माझी विनंती आहे. _मी वर्णन केलेल्यांपैकी पुष्कळशा बाबती सामान्य सिद्धांताच्या आहेत, असें कांहीं वाचकांना वाटेल. विषयाची निवड करणे मला बरेच कठिण गेले. कारण, माझी वाचकमंडळी ब्रिटिश, तशीच हिंदीही असणार, हे मी जाणून होतो. माझा प्रयत्न विशेषतः हिंदी लोकांसाठी लिहिण्याचा, इंग्रजांकरितां नव्हे. त्यांत कितपत यश आले आहे, ते ठरविण्याचे काम मी वाचकांवर सोपवितो. ब्रिटिश