पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रास्ताविक अग्रलेख. त्यांचे विविध आचार व धर्मकर्म, यांना ते पूर्ववत् भक्कम पाठिंबा देतच आहेत. अशा त्यांच्यासारख्या विख्यात, सर्वमान्य, व सर्वत्र वजन असलेल्या सद्गृहस्थांची भेट झाल्याने मनाला फारच आनंद व उत्साह वाटला. हिंदुस्थानविषयक ग्रंथ प्रसिद्ध करणारे नामांकित प्रकाशक, मि० एफ्. एच. ब्राउन, यांनी कृपा करून, मी परत यण्यास निघाल्यानंतर, हे पुस्तक नीटपणे छापले जाण्याची जबाबदारी पतकरिली, याबद्दल मी त्यांचा मोठा ऋणी आहे. मुंबई इलाख्याच्या पोलिटिकल खात्यांतील मे० क्याप्टन ल्यांग आणि मिसेस ल्यांग, यांनी सौ० राणीसाहेबांचा व माझा प्रवास सोईस्कर व सुखदायक करण्याच्या कामी अत्यंत श्रम घेतले. क्याप्टन ल्यांग यांचा मला या पुस्तकाच्या संबंधानेच नव्हे, तर युरोपांतील लांबलचक सफरींतील प्रत्येक प्रसंगी मोठाच उपयोग झाला. त्यांनीच या सफरीचा कार्यक्रम तयार केला, त्यासंबंधी सर्व व्यवस्था लाविली, आणि त्या व्यवस्थेनुरूप सर्व गोष्टी जुळवून आणिल्या. याबद्दल मी त्यांचे अत्यंत व मनापासून आभार मानितों. इंग्लंडांत असतांना ज्या अनेक कृपाळू मित्रांनी मला पुष्कळशा गोष्टी पाहतां येण्याची तजवीज केली, आणि जणों मी त्यांच्यांतलाच एक आहे असें वाटण्यासारखं माझ्याशी वर्तन ठेविलें, त्यांचाही मी फार ऋणी आहे. हा लेख पुरा करण्यापूर्वी मला, माझे प्रिय पुतणे रावसाहेब जोशी आणि लघुलेखक मि. एच्. व्ही. आश्टन, यांचेही आभार मानणें अवश्य आहे. त्यांनी तत्परतेने व एकनिष्टपणे साहाय्य केले नसते तर मला हे लेख इतक्या जलदीने व सहजपणे संपवितां येणे शक्य झाले नसते. लंडम, नोव्हेंबर १९१४. । नारायणराव बाबासाहेब, चीफ ऑफ इचलकरंजी