पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. संबंधाच्या कायद्या-ची चांगली माहिती करून घेतां आली. अशा संस्थांची व्यवस्था ग्रामसंघांच्या अधिकारायांच्या स्वाधीन असते.त्यांना 'बोर्ड आफ् गार्डियन्स्'-पालक मंडळीम्हणतात. त्यांना ' पूअर लॉ'च्या अन्वयें बसविलेल्या करांच्या उत्पन्नांतून द्रव्यसाहाय्य मिळते. या 'पूअर हौस' मध्ये, सुमारे ९७००० वस्तीच्या ग्रामसंघांतील गरीब लोकांची सोय होण्याची व्यवस्था केलेली आहे.अगदीच कंगाल स्थितीला पोहोंचलेल्या माणसाला, अशा संस्थांमध्ये जाऊन, तेथे अन्नआच्छादनाची व रहाण्याची तजवीज, सार्वजनिक खर्चाने करवून घेता येते. ही गोष्ट, इंग्रज लोकांच्या इतिहासाशी परिचय असलेल्या सर्व लोकांना माहीत आहे. यासंबंधाचे उल्लेख अनेक कादंबऱ्यांमध्ये, विशेषतः डिकेन्सकृत 'आलिव्हर टिस्ट ' या कादंबरीमध्ये, केलेले आहेत. या कादंबरीत वर्क हौसमधील गरीब लोकांचे जे हाल होत असत आणि प्रसंगविशेषीं त्यांना ज्या क्रूरपणाने वागवीत, त्याचे वर्णन केलेले आढळतें. पण डिकेन्सने आपल्या वेळी प्रचलित असलेल्या वर्क होसमधील अव्यवस्था व अयोग्य प्रकार उघडकीस आणल्यापासून, अलीकडे त्यांची स्थिति सारखी सुधारत चालली आहे. अगदी अलीकडे पंर्यंत सुद्धा वर्क हौस मध्ये जाणे लोकांना भीतिप्रद,लाजिरवाणे, व हीनता आणणारे वाटत असे. पण आतांशा या संस्था इतक्या सदयतेने चालविल्या जात आहेत की, त्यामुळे पुष्कळ अंशी त्यांची पूर्वीची बदनामी