पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग तरावा. भाग तेरावा. सरकारी मदत व दानधर्म. 'त्याची हाडे दगडावर खडबडवा. तो एक कंगाल भिकारी. त्याला आपला असें ह्मणणारा कोणी नाही.' 'टामस् हूड.' इंग्लडांतील सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच्या स्थितीला या ओळी अन्वर्थक लागू असल्या तरी, त्या आजकालच्या स्थितीला लावतां येण्याजोग्या नाहीत. कारण, हल्ली गरीब लोकांची चांगली काळजीपूर्वक जोपासना होते. त्यांना पोटभर खाण्याला व बऱ्याच आरामांत राहण्याला मिळते. इतकेच नव्हे, तर मेल्यावर त्यांची प्रेतयात्राही नीटपणे केली जाते. म्हणून हूडनें वरील व्याजोक्ति, ज्या लज्जास्पद प्रसंगाला अनुलक्षून लिहिली आहे, तो येण्याची स्थिति आतां बहुतेक राहिलीच नाही, असे ह्मणतां येईल. न्यूटन अब येथील वर्क हैस-गरीबखान्या-चे व्यवस्थापक यांनी कृपा करून आमांला तेथील व्यवस्था नीटपणे बरोबर फिरून दाखविली. त्यामुळे आम्हांला इंग्लंडांतील 'पूअर लॉ सिस्टिम'-गरीब लोकांच्या १६५