पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. 'क्याडेट्स ' एका बोटींत बसून हवा खाण्याला गेलेलेही आम्ही पाहिले. शिक्षण, व्यायाम व आराम, या सर्वांसाठी ही बोट त्यांना उपयोगांत आणतां येते. - आह्मी तेथून परत आल्यावर आगबोटीतून डार्ट नदीच्या वरच्या भागांत सहल करण्याला जाण्यापूर्वी वेळांत वेळ काडून 'बटरवॉक् ' पाहून आलो. जुन्या इंग्रजी त-हेच्या गल्लीचा तो एक मासलेवाईक नमूना असून त्याच्या बाजूला असलेल्या त-हेदार घरांना विलक्षण कोरीव काम केलेल्या लांकडी ग्यालय-सज्जे-आहेत. नंतर आमी लांचआगबोटी-वर चढलो. तिच्यावरूनच आह्मीं ब्रिटानिया नांवाचे ट्रेनिंग क्रूझर-शिक्षण देण्याचे गलबत-पाहिले. ते फार दिवसांपासून लढाऊ कामाला निरुपयोगी झालेले आहे. त्याच्या डेक्वरील भागावर गवती छपरें घातलेली आहेत. त्यामुळे तें नदीतील समर हौस-हौसेने उन्हाळ्यांत राहग्याच्या तरत्या घरा-सारखे दिसत होते. हल्ली निरुपयोगी झालेले हे गलबत पूर्वी एक वेळ, ब्रिटिश आरमारामध्ये अत्युत्तम लढाऊ गलबत समजले जात होते, हा विचार मनांत येऊन आजकालच्या नव्या लढाऊ क्रूझरमध्ये त्याच्या मानाने ज्या सुधारणा झालेल्या आहेत, त्या पाहून मी चकित झालों.