पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुंदर डेव्हनमध्ये. ( शिल्पशास्त्र ) व नौस्तरणविद्या, इत्यादि विषय पढवितात. एका कमऱ्यामध्ये आह्मी निरनिराळ्या त-हेची जहाजें व गलबतें यांचे नमूने ठेवलेले पाहिले. दुसऱ्या एकामध्ये नौकानयनविषयक शिक्षण देण्याला लागणारी यंत्रे लावून ठेवलेली होती. तेथील पाकशाळा व भोजनशाळा आह्मीं पाहिल्या. तेथे काम करण्याला सोपे जाण्यासाठी बशा घासण्यापासून तो सफरचंद व बटाटे यांच्या साली काढण्यापर्यंत योजिल्या जाणाऱ्या सर्व आधुनिक क्लुप्ती व साधने वापरांत होती. अंमलदार लोकांनी सोईनें व आरामात एकत्र भोजन करणे, बिलियर्ड खेळणे, पोहणे, बाहेर मोकळेपणी व्यवस्थेनें टेनिस खेळणे, इत्यादिकांसाठी पृथक् व सोईवार जागा होत्या. टेकडीवरून खाली नदीवर जातांना, आम्ही तेथील वर्कशॉप पाहिले. तेथें 'क्याडेट्स ' लोकांना जहाजाचा प्रत्येक भाग तयार करणे व दुरुस्त करणे, ही कामें शिकावी लागतात. तेथें विद्युच्छास्त्राची शाखाही आहे. तिच्यांत ते आपापली यंत्रे, मोटार्स, डायन्यामो, वगैरे तयार करितात. 'क्याडेट्स' लोक जहाजाचे निरनिराळे भाग तयार करीत होते, त्याचे आम्हांला पुष्कळच कौतुक वाटले. कांहीं ' क्याडेट्स' एका मोठ्या जहाजाचा मोडलेला 'प्रोपेलर' स्क्रू-गति देणारा पंखा-नीट करीत होते. येथें विश्रांति व आराम यांच्या आवश्यकतेकडेही दुर्लक्ष केले जाते असे नाही. काही १६३