पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. दर्जापर्यंतचे शिक्षण दिले जाते. तेथील तरुण व जोमदार विद्यार्थी उदात्त महत्त्वाकांक्षेनें प्रेरित झालेले असून, भविष्यकाळी त्यांना ज्या जबाबदारीच्या अधिकारावर नेमलें जावयाचे होते, त्या अधिकाराच्या जागेची पात्रता अंगी येण्यास आवश्यक असणारे शिक्षण ते आस्थेनें ग्रहण करीत होते, हे पाहून आह्मांला आनंद झाला. त्यांनी पहिली दोन वर्षे आस्बोर्न येथे घालविल्यानंतरच त्यांचा या कॉलेजांत प्रवेश होतो. येथे दोन वर्षे शिक्षण झाल्यावर, त्यांना एका 'क्रूझर' वर पाठविण्यांत येते. तेथे त्यांना 'सब-लेफ्टेनेंट'चा हुद्दा मिळविण्याची योग्यता संपादन करावी लागते. या नेव्हल कालेजांत शिक्षण पुरे होण्याला, प्रत्येक 'क्याडेट्'ला प्रतिवर्षी सुमारे शंभर पौंड व 'सब-लेफ्टनंट'च्या पायरीपर्यंत पोहोंचण्याला एकंदर एक हजार पौंड (१५००० रु०) खर्च येतो. ____ या ' क्याडेट्स' ना स्वतंत्र कोठड्या नसतात. त्यांना एका 'डामिर्टरी'-निजण्याच्या कमन्या-मध्ये निजावें लागते. सामान ठेवण्याला प्रत्येकाच्या वेगळाल्या पेट्या असतात त्याही तेथेच ठेवतात. कॉलेजांत लिहिण्यावाचण्याच्या सर्वोस्कृष्ट जागा असून भरपूर लायब्ररीही आहे.तेथील दिवाणखान्याला 'क्वार्टर डेक् ' म्हणतात. या ठिकाणी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतात. त्याच्या सभोवार शिक्षणाचे वर्ग आहेत. तेथे 'केमिस्ट्री (रसायनशास्त्र), 'डायनामिक्स्' (गतिशास्त्र), 'स्टॅटिक्स' (स्थितिशास्त्र), गणित, खगोलविद्या, 'इंजिनियरिंग'