पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुंदर डेव्हनमध्ये. संतोषाची गोष्ट होय. कारण, अप्रतिहत दर्यावर्दी बलासंबंधाने साऱ्या दुनियेत इंग्लंड अब्बल दर्जाचे असून, आरमारी खात्यांतील योध्द्याविषयीं इंग्लंडाला मोठा अभिमान व पूज्यभाव वाटतो. ड्रेक, फ्रोबिशर, प्याले, नेल्सन, ही नांवें प्रत्येक इंग्रजाच्या मनामध्ये अत्युच्च ध्येय व वरिष्ठ प्रतीच्या उमेदी उत्पन्न करितात. हिंदुस्थानाजवळच्या दर्यामध्ये कधी कधी आम्हांला लढाऊ गलबतें पाहण्याची संधि सांपडते. अशा लढाऊ गलबतांवर हिंदुस्थानचे संरक्षण व इंग्लंडचा अभिमान अवलंबून असल्याने, त्या गलबतांवर अधिकारी होणाऱ्या तरुण इंग्रजांना ज्या संस्थेमध्ये त्यासंबंधी पुरे शिक्षण मिळते, ती संस्था समक्ष पाहण्याची मला फार दिवसांपासून स्वाभाविक इच्छा होती. ग्रेट ब्रिटनची फौज भारी, मोठी व जय्यत आहे, हे खरे. पण त्याचा बिनतोड वरिष्ठपणा त्याच्या अप्रतिहत दर्यायी बलावरच आहे. म्हणून या सफरीसंबंधाने मी फार उत्कंठित होतो व ती संस्था पाहण्याचा माझा हेतु पुर्तेपणीं सफल झालेला पाहून, मला भारी संतोष वाटला. रायल नेव्हल कालेजच्या उत्तम इमारती एका बऱ्याचशा मोठ्या उचंवट्यावर बांधलेल्या आहेत. त्या तांबड्या रंगाच्या असून तेथून भोवतालच्या सुंदर टेंकड्या, खोरी, नदी, समुद्र, वगैरेचे देखावे, फारच सुरेख दिसतात. या कॉलेजांत "क्याडेट्स'-तरुण होतकरू अंमलदार-यांना शेवटच्या वरिष्ठ १६१