पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. असली भाषणे ऐकण्याला पुरा निर्दावलेला होता, असें दिसलें; आणि ती भाषणे त्यांच्या नित्यपरिचयांतली असल्यामुळे त्यांतील शब्द आतशय जोरदार होते तरी, ते योजण्याचा वक्त्याचा उद्देश, व त्यांचा तीक्ष्णपणा, पुष्कळ अंशानें वायफळ समजला जात होता, हे स्पष्ट दिसत होते. कर्नल बर्न हिंदुस्थानांत जाऊन आलेले असल्याने त्यांनी मला पाहातांच, मी तिकडचा आहे, असें चटदिशी ताडले, व ते मेहरबानगी करून स्वतःच मजकडे येऊन कांहीं वेळ बोलत राहिले होते.. टॉट्नेला डार्ट नदीच्या मार्गाने आगबोटीतून जाऊन येण्याची सफरही, मला फार पसंत वाटली. ही नदी इंग्लंडांतील व्हाईन अशी संबोधिली जात असून, ती सुरेख हिरव्या गर्द टेकड्या व छायादार वनभूमी यांच्या मधून वाहते.. तिच्या त्या शांत व रमणीय पृष्ठभागावर गेलेला काळ फारच मजेदार वाटला. तरी पण माझ्या पूर्वजांच्या जन्मभूमीतीलकोंकणांतील-सृष्टिसौंदर्य, तेथील आंबा, फणस वगैरे सुंदर झाडे, व जागजागी थाटदार ताडमाड वगैरे झाडांनी भूषित केलेले खडबडीत समुद्राचे कांठ, इत्यादिकांच्या अप्रतिम देखाव्याबद्दल मला अधिक पक्षपात वाटतो. याबद्दल मला. माझे विलायतेंतील मित्र क्षमा करतील अशी उमेद आहे. डारमथ् येथील रॉयल नेव्हल कालेज तेथील अधिकायांच्या दाक्षिण्यसंपन्नतेमुळे मला जाऊन पाहतां आले, ही १६०