पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुंदर डेव्हनमध्ये. चते. यामुळे येथून पळून जाण्याचा धोका अधिकच वाढलेला आहे. येथून कैदी पार निसटून गेल्याची उदाहरणे फारच क्वचित् आहेत, हे निराळे सांगावयाला नकोच. * आणखी एके दिवशी तिसरे प्रहरी आझी पेंटन्ला जाऊन आलो. ही सफरही मोठी मजेची झाली. त्या दिवशी तेथें कांहीं मनोहर उत्सव सुरू होता. असे उत्सव इकडे बहुतेक सर्व ठिकाणी उन्हाळ्यामध्ये होत असतात. हिंदुस्थानांत वेळोवेळी यात्रा व मेळे भरतात, त्या व या उत्सवांमध्ये बरेचसें -साम्य नसते असे नाही. त्यांच्यांत सर्व त-हेच्या खेळतमाशांची व्यवस्था असते, व तेथें मजा मारण्यास येणाऱ्या हौशी लोकांच्या करमणुकीसाठी अनेक त-हेच्या किरकोळ गोष्टीही असतात. तेथील चैनी व मजेनें फिरत राहणारा जनसम्मद फारच प्रेक्षणीय वाटतो. अशा प्रसंगी पार्लमेंटचे मेंबर मतदारांचा विशेष परिचय करून घेण्याची संधि साधतात. येथील मेळ्यामध्ये 'युनियनिस्ट' पक्षाने त्या दिवशी एक जलसा केला होता. त्यांत क्याप्टन क्रेग, एम्. पी. व कर्नल बर्न, एम्. पी., यांनी 'आयरिश् - होमरूल '-आयर्लंडांतील स्वराज्यावर व्याख्याने दिली. आजकाल या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष प्रमुखतेने वेधलेले आहे. त्यांची भाषणे फारच जोरदार होती. त्यांनी वापरलेली भाषा हिंदुस्थानांतील एक्स्ट्रीमिस्ट' - जहाल-पक्षाचे लोक स्वप्नांतसुद्धां बहुधा उपयोगांत आणणार नाहीत, इतकी कडक होती. तथापि श्रोतृसमाज