पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

___ माझा विलायतेचा प्रवास. मोठ्या अभिमानपूर्वक दाखवितो. तेथील 'क्याथील' बाराव्या शतकांतले आहे. त्याचा पश्चिमेकडील मोहरा फारच भव्य व अप्रतिम सुरेख, ह्मणून प्रसिद्ध आहे. त्या शहरांत कॉलेजें, लायऱ्या, चित्रकलाप्रदर्शनें, पदार्थसंग्रहालये इत्यादिकांची चांगली समृद्धि आहे. तेथील बगीचे फारच . शानदार स्थितीत ठेवले आहेत.शिवाय, तेथे असलेल्या जुन्या व पडक्या किल्ल्याच्या अवशिष्ट भागांमुळे या शहराला बराच मनोहरपणा आला आहे. येथून प्रिन्सटौन्ची सफर सहज व चांगली करून येतां येते. तिकडे जाण्याचा रस्ता पाणथळ व जंगली प्रदेशांतून असून, तेथें विलायतेंतील मुख्य सदर तुरुंग आहे. तो त्या पाणथळ रानाच्या मध्यभागी एका टेकडीवर बांधलेला आहे. त्याच्या आंत पाहण्यास जाण्याला कोणालाही परवानगी मिळत नाही. सबब, या उग्रस्वरूपी इमारतीला गाडीतूनच एक प्रदक्षिणा घालून परत यावे लागले. जवळच्या शेतजमीनीत कांहीं कैदी काम करीत होते, ते आमी पाहिले. त्यांच्यावर पाहारेवाले, भरलेल्या बंदुका घेऊन खडा पाहरा करीत होते. त्या कैद्यांचे केस डोईबरोबर कापलेले होते,व त्यांच्या अंगावर तीराच्या टोकांचे छाप असलेले विवक्षित त-हेचे कपडे होते. ते आमाला भारी विलक्षण दिसले. येथून कैदी निसटून जाणे फारच कठिण व धोक्याचे आहे.या तुरुंगाभोवती टेहळणीसाठी बुरूज बांधलेले असून, त्यांच्यावरून दूरवर नजर पोहों १५८