पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुंदर डेव्हनमध्ये. जंगली त-हेचा असून तो मनाला हवा तसा पसंत पडण्याजोगा आहे. समुद्रकाठचे पांढरें फटफटीत वाळवंट, निळे पाणी, पहाडांचे ताम्रवर्ण कडपे, व हिरवेगर्द वृक्षगण, असे अनेक रंगांचे युगपत् मिश्रण होऊन झालेला देखावा, मोठा बहारीचा असतो. येथूनच ऑडिकोंबच्या समुद्रतीरच्या वाळवंटावर जाण्याचा भारी सुरेख नागमोडी रस्त्याचा मजेदार देखावा दृष्टीस पडतो. पुढील वाट टेकड्या व खोरी यांच्या मधून जाते. त्यावरून जागजागी समुद्राचा विस्तीर्ण देखावाही दुरून दिसत राहतो, तो अवर्णनीय–केवळ चित्रासारखा भासतो. टिनमथ् हे एक सुंदर व आरोग्यवृद्धि करणाऱ्या पाण्याचे स्थळ आहे. उन्हाळ्यांत दुसरीकडे राहण्यास जाणाऱ्या बऱ्याच लोकांना ते फार प्रिय आहे. डॉलिश् हे लहानसे गांव जवळच आहे. तेथे समुद्रस्नानाची व्यवस्था चांगली असते. येथून पुढे कांहीं मैलांवर एक्झीटर आहे. हे फार प्राचीन शहर रोमन लोकांच्या वेळी वसलेले असून, तें डेव्हनशायरचे मुख्य ठाणे आहे. येथील गिल्डहॉलची इमारत साऱ्या ग्रेट ब्रिटन मधील प्राचीन म्युनिसिपल इमारतींपैकी एक आहे. ती अवश्य पाहावी. तेथील 'सिटि आर्स,' 'मेयर'चे पोषाख, भालदारकाठी व इतर सुरेख व चमत्कारिक चिजा, एका तावदाने लावलेल्या कपाटांत ठेवलेल्या आहेत. दरवाजा ओक लांकडाचा असून, त्याच्यावर सुरेख कोरीव काम केलेले आहे व ती इमारत दाखविणारा तो दरवाजा १५७