पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रास्ताविक अग्रलेख.


- -- -- मला मुख्त्यारी मिळून संस्थानचा पूर्ण अधिकार माझ्या हाती सोंपला जाण्यापूर्वी स० १८९१ साली मी उत्तर हिंदुस्थानांतील निरनिराळी स्थळे पहात पुष्कळसा प्रवास केला. त्या वेळी आपल्या इष्टमित्रांच्या उपयोगासाठी मी रोजनिशी ठविली होती. स० १८८३च्या डिसेंबर महिन्यांत कलकत्ता येथे सकलराष्ट्रीय प्रदर्शन झाले. ते पाहण्याकरितां माझी लहानपणची प्रथमची सफर झाली. ती मला आठवते. आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपाल साहेबांनी मला त्या प्रदर्शनाचा वर्णनात्मक निबंध लिहिण्याला सांगितले. हिंदुस्थानांत अशी प्रदर्शनें अपूर्व, त्यांतून हे सकलराष्ट्रीय प्रदर्शन. यामुळे माझा तो छोटा लेख विद्यार्थ्यांनीच नव्हे पण शिक्षक व प्रोफेसर यांनीही उत्सुकतेने वाचल्याचे मला चांगले स्मरण आहे.

दिल्ली येथील राज्यारोहणप्रसंगींचे दोन प्रचंड दरबार अशासारखे समारंभ, तसेंच हिंदुस्थानांतील प्रेक्षणीय स्थळे पाहणे, यासाठी प्रवास करण्याचे मला प्रसंग आले. पण स. १९१२ च्या उन्हाळ्यामध्ये मी मलाया द्वीपकल्प व जावा बेट इकडे जी सफर केली ती फारच फायद्याची झाली. समुद्रपर्यटणाने स्वतःच्या प्रकृतीवर काय परिणाम होतो हे पाहण्याच्या हेतूनेच ही सफर मी मुख्यत्वेकरून केली होती. तरी तिच्यापासून मला अन्यत-हेने पुष्कळ उपयोग झाला, त्याच्या.