पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. अशा त-हेच्या शास्त्रीय शोधांचे निर्णय प्रत्यक्ष पाहून, ज्ञानार्जन, तसेंच करमणूक, करून घेण्याची सुलभ संधी बहुजनसमाजाला मिळते, हे लक्षात ठेवण्याजोगे आहे. अशी स्थळे पाहण्याला मोकळी ठेवल्याने व तेथील माहिती करून. देण्याला मार्गदर्शक नेमल्याने, एकाद्या वाटसराला सुद्धा त्यांचा उपयोग करून, त्यांच्यांतील तत्त्वं सहज समजून घेण्याला व त्यापासून मिळणारे शिक्षण प्राप्त करून घेण्याला सवड सांपडते. हिंदुस्थानांत अशा गुहा पुष्कळशा आहेत. त्यांच्यापासून किती तरी नवीन शोध लागण्यासारखे आहेत. पण तज्ञ व नवीन शोध लावणाऱ्या मंडळीचे तिकडे लक्ष जात नाही, हे आमचे कमनशीब होय. अद्यापि अशा गुहांचे संशोधन झालेले नाही... याविषयींचा दोष तरी, पुष्कळ अंशी आमच्यावरच आहे. या आमच्या गुहांची सुद्धां शास्त्रीय रीत्या तपासणी केली गेली तर, त्यांच्यापासून सृष्टिसंबंधाच्या वास्तविक ज्ञानामध्ये पुष्कळच, भर पडेल, अशी मला खात्री वाटते. _टार्केपासून जवळपासच्या रम्य स्थळांचे दर्शन घेऊन, येण्यासाठी पुष्कळशा सफरी करता येण्यासारख्या आहेत. अशी एक मोटारमधून करता येण्याजोगी मजेदार, व रमणीय, आणि त्यापासून होणारा त्रास व परिश्रम यांची पुर्ती भरपाई करणारी सफर 'टिनमथ् ' व पुढे 'एक्झीटर ' पर्यंत जाऊन येण्याची आहे. 'बबकोंब' जवळ समुद्राचे एक सुरेखसें वळण आलेले आहे. तेथील देखावा उग्र व अधिक