पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुंदर डेव्हनमध्ये. माहिती सांगतो. भूगर्भशास्त्रज्ञ व इतर शास्त्रवेत्ते, यांनी या गुहेत काळजीपूर्वक खोदवून पाहिले आहे. तिच्यांतील 'स्टाला-गमाइट्'-चुन्याचे पाणी पडून, वाळून, चुनखडीचे पुष्कळच जाड थर बसून झालेली जमीन-इच्या खाली आस्वलें, सिंह, गेंडे, इत्यादिकांचे अवशेष, आणि अगदी प्राथमिक काळी वापरण्यांत असलेली गारेची हत्यारें, व लांकडी कोळसा, वगैरे जिन्नस आढळून आले आहेत. त्यांच्यावरून मनुष्याच्या प्राचीनत्वाची साक्ष पटते. असल्या गुहांपासून शास्त्रज्ञ मंडळींच्या शोधाला किती उपयोग होतो, हे समजून घेणे गमतीचे असते. अनेक युगांपूर्वीच्या माणसांनी हत्यारे म्हणून उपयोगांत आणलेल्या गारेच्या तुकड्यांवरून, ते त्यांनी केव्हां कामी आणले असतील, हे ठरविण्याला साधन होते. तसेच त्या 'स्टालागमाइट'च्या स्तंभाच्या वाढीवरून तज्ञ गृहस्थांना, मनुष्यप्राण्याचा इतिहास व त्याच्या चालीरीती, यांचे ज्ञान होण्याला मदत होते आणि असल्या गुहांमध्ये मनुष्यप्राणी किती काळापूर्वी राहत होता, ते बहुतेक नक्की ठरविण्याला सांपडते. या गुहेतील 'स्टालागमाईट्' च्या स्तंभाइतका मोठा स्तंभ साऱ्या दुनियेत इतर कोठे नाही, असे समजले जाते. या स्तंभावर विवक्षित स्थळी एक खूण करतात. पुढे कांहीं ठरीव काल-उदाहरणार्थ दहा वर्षे गेल्यानंतर, त्याच्यांत झालेली वाढ पाहून, तिच्यावरून, तो हल्ली आहे तितका उंच होण्याला किती शतकें लागली असतील, त्याचा हिशेब बसवितात.