पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ज्ञान, आस्था व विचार, चांगले असतात. त्यांना गातां येते. पियानो वाजवून मनोरंजन करता येते. शिवाय, पुष्कळशा बायका चित्रे काढणे वगैरे कलांमध्येही निपुण असतात. त्यांच्या या गुणांच्या योगानें कौटुंबिक सुस्थिति व गृहसुख यांमध्ये पुष्कळच भर पडते. ____टार्के येथे मी थोडे दिवस 'म्यासेज' ( मालीश )-अंग रगडून घेण्याचा डाक्तरी उपचार-चा अनुभव घेतला. त्याचे आजकाल एक शास्त्रच बनले आहे. दुखण्यांतून नुकत्याच उठलेल्या, व्यायाम करण्याला असमर्थ, अशा अशक्त लोकांना तो फायदेशीर होतो. हा उपचार ठरलेल्या जागीच दिला जातो. - त्याचे उत्तम शिक्षण पावून 'डिप्लोमा' ( सर्टिफिकीटें मिळालेल्या स्त्रिया, त्या जागी हजर असतात. आजाऱ्याच्या घरी जाऊनही हवा तर हा उपचार करतात. ही कला आपल्या प्राच्य देशांत बहुतेक पूर्णावस्थेला पोहोचली आहे. आणि या बाबतींत प्राच्य देशीयांकडून आपण पुष्कळ शिकलों आहों, असें इकडील इंग्रज लोक कबूल करितात. _टार्केपासून दीड मैलावर 'धि केंट केव्ह' नावाची एक चुनखडीच्या दगडांतील गुहा आहे. ती अवश्य पाहण्याजोगी आहे. तिची लांबी पाव मैलाहून थोडी अधिक, व उंची पांचपासून वीस फुटांपर्यंत आहे. तेथे असलेला वाटाड्या पाहणारांना गुहेचा आंतील भाग चांगला दिसावा म्हणून मेणबत्त्या आणून लावून देतो, व महत्त्वाची स्थळे दाखवून त्यांच्या विषयी