पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुंदर डेव्हनमध्ये. उपयोग होतो. कारण, त्या सुशिक्षित असल्यामुळे त्यांना हे काम सहज व चांगले करता येते. हिंदी शेतकऱ्यांच्या बायका शेतात हलकें सलके अगर मेहनतीचे काम करून मदत करितात; पण लिहिण्यासवरण्याच्या कामी त्याची मदत होत नाही. येथे नवरा-बायको दोघेही उद्योगधंदा व व्यवहार यामध्ये अत्यंत हुषार व दक्ष असल्यामुळे, श्रमविभाग सुरेख व फायदेशीर होतो; आणि घरदार व गृहकृत्ये यांची देखरेख व शेतवाडीचे कारकुनी काम बायकांकडे सोपविलेलें असते.स्त्री पुरुष,दोघांच्याही शिक्षणासंबंधाने समता राखल्याचा हा एक चांगला परिणाम आहे. टार्के येथे असतांना मी काही गृहस्थांच्या घरी भेटीला गेलो होतो. त्यावेळी पाहण्यांत आलेल्या परिस्थितीवरून,. इंग्रज लोकांच्या कौटुंबिक स्थितीसंबंधी मला अधिक स्पष्ट कल्पना आली. समाजामध्ये पुरुषांपेक्षां स्त्रियांकडेच अधिक महत्वाचा कार्यभाग असतो, हे माझ्या ध्यानात आले. तेथे स्त्रिया व पुरुष एकमेकांत मोकळेपणी मिसळतात आणि उभयतांचे शिक्षण व ज्ञान, बहुतेक सारखेच असल्यानें, कौटुंबिक व सामाजिक जीवन हिंदुस्थानांतल्यापेक्षा किती तरी सुखासमाधानाचे व उपभोगक्षम असते. इंग्लिश स्त्रियांची ज्ञानसंपन्नता व तदनुरूप वर्तन प्राच्य देशीयांच्या मनांत विशेष जोराने भरते. त्या स्त्रिया संभाषण चालविण्याच्या कामी विशेष चतुर असतात. नित्याच्या व्यवहाराच्या बाबतीत, त्यांचे परि १५३