पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. मातीत मिसळविता येते. बहुतेक शेतकरी,गाई, डुकरें, कोंबडी बाळगितात व ती पुष्ट करून विकतात. त्यांच्यापासून त्यांना चांगलाच नफा होतो. डुकरें व कोंबडी पाळण्याला विशेष खर्च पडत नाही. इकडील गाई विशेष मोठ्या आहेत, असें नाहीं; तरी त्या रोज सरासरीने पंधरा वीस पौंड ( साडेसात ते दहा शेर ) दूध देतात. या शेतकऱ्याच्या सुमारे २५ गाई आहेत. त्यांच्यापासून निघालेल्या दुधाची साय व लोणी, शक्य तितकें विकून, बाकीचे दूध तो डुकरांना घालतो. डेव्हनशायरमधील गाई दुधाला फार चांगल्या, अशी प्रसिद्धि आहे.तिकडील'क्रीम'–साय-साऱ्या इंग्लंडांत अति उत्तम असल्याबद्दल ख्याति आहे.ती आपल्याकडील मलईसारखी असते. - त्याच दिवशी आमी एका गुरें पैदा करण्याच्या शेतवाडीलाही जाऊन आलो.तेथे इंग्लंडांतील अतिउत्तम जातवंत पैकी४२ गाई होत्या. त्या पूर्वी पाहिलेल्यापेक्षां पुष्कळच मोठ्या असून, रोज सुमारे तीसपासून पन्नास पौंड( पंधरापासून पंचवीस शेर) व कांही तर सत्तर पौंड ( पस्तीस शेर ) दूध देतात ! त्यांचा खुराक प्रत्यही पांच पौड दाणा व खातील तितकें वाळलेलें गवत. येथील पैदायषीचा खोंड झणजे एक अजस्र मांसपिंडच. त्याच्या त्या भारीच पुष्ट शरीराला त्याचे लहानसे चार पाय, कांठया टोचल्यासारखे दिसत होते. त्याची लांबी बारा फूट व वजन दीड टन (दोन खंडी) होतें ह्मणतात. त्याला रोज शंभर पौंड ( पन्नास शेर ) म्यांगोल्ड' लागत. ही जनावरे १५०