पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुंदर डेव्हनमध्ये. आमी पाहिलेल्यांपैकी एक शेतवाडी सुमारे दोनशे एकरांची होती. आम्हांला प्रथमच मालकाचे घर, मेहेरबानगी करून, फिरवून दाखविण्यात आले. त्यांतील प्रत्येक वस्तु ठाकठिकीची व साफ होती; आणि सामानसुमान व शोभेच्या वस्तू, यांच्या संबंधांत, हे साधारण प्रतीचे घरसुद्धां, हिंदुस्थानांतील पुष्कळशा श्रीमंत लोकांच्या वाडयांपेक्षा अधिक चांगले होते. शेतावर काम करणाऱ्या मजुरांची सुद्धा येथेच चांगली राहण्यासवरण्याची सोई केलेली आहे. शेतांत निरनिराळ्या भागांत फिरून येत असतांना मालकाने आम्हांला, इकडील शेतीभातीविषयी पुष्कळ उपयुक्त व मनोरंजक माहिती सांगितली. इकडे अा जमिनीतून पिके घेतात व अर्ध्यात गुरें चारतात, आणि हिवाळ्यांत गुरांना लागणारा चारा पैदा करितात. हा जमीनदार तीन वर्षांच्या फेरपालटीने पिकें घेण्याची तन्हा पसंत करितो. गहूं किंवा 'ओट्स,' 'बाल - जव-आणि 'म्यांगोल्डस्' अथवा 'टर्निप्स्' आणि चारा अशी तीन पिके फेरपाळीने घेत असतो. इकडे जमिनीत खत फारच घालतात. एकरामागें गोठ्यांतले खत २० टन (सुमारें४० गाडया) इतकें सुद्धा आणि सुपीकता आणणारें चुना किंवा हाडाचे खत दीडपासून अडीच टन (सुमारे तीनपासून पांच गाड्या ) पर्यंत घालतात. हिंदुस्थानांत गोठ्यांतलें खत उपयोगात आणण्यापूर्वी वर्षभर किंवा आधिकच कुजवावे लागते; पण इकडील जमिनीच्या स्थितीमुळे, ते एकदम शेतांत टाकून, नांगरून