पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुंदर डेव्हनमध्ये. फारच उग्र व तापट असतात; म्हणून त्यांना स्वतंत्र वाडग्यांत एकीकडे ठेवतात. खोंड अकरा वर्षांचा होईपर्यंतच त्याचा उपयोग करितात व त्यांना कमी वयांतच कामी आणतात, असे या शेतक-याने सांगितले. जनावरें विकावयाला पाठविण्यापूर्वी त्यांना पुष्ट करण्याची जागाही आह्मीं पाहिली.. यांत पुष्ट करण्याला चार महिने लागतात व प्रत्येक गुरामागें सुमारे एक पौंड महिना खर्च पडतो. सुमारे अठरा हंड्रेडवेट वजन (चोवीस मण) असलेलें गुरूं चांगले पोसलें तर, बाहेर पडतांना सुमारे ३१ हंडेडवेट (बेचाळीस मण) भरते. नंतर आगीं याहून एक मोठी शेतवाडी आश्बर्टनजवळ पाहिली.शेतकीसंबंधी सर्व माहिती तेथील मालकाच्या जिव्हाग्री होती. त्याच्या सहवासांत आमचा वेळ मजेदार व आनंदांत गेला. त्याने, शेतांतील लहानसहान दगड ( गुंड ) वेचून काढवू नयेत, कारण त्याच्या योगाने जमिनीत ओलावा राहण्याला मदत होते, हा एक उपयुक्त माहितीचा चुटका आम्हांला सांगितला. ' ओटस् 'च्या पिकाला तो दर एकरी सारे पंधरा टन गोठ्यांतलें खत घालतो, व 'म्यांगोल्ड्स्' साठी हाडाचे खत अर्धे टन. तेंच गवती जमिनीला पांचपासून दहा टन खत लागते. साध्या गवतापेक्षां हाडांचें खत घातलेल्या कुरणांतील गवतावर पोसलेली गुरें अधिक मजबूत असतात, असा त्याचा अनुभव आहे. एकाच खोंडापासून झालेल्या पैदासीत पुन्हां त्याच्याच प्रजोत्पादनाचा उप