पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'लोकमत' आणि 'ब्रिटन व इंडिया,' हे शेवटचे दोन भाग लहानसेच पण फार सुरेख लिहिलेले आहेत. पहिल्यांत ग्रेट ब्रिटनमध्ये लोकमत कसे तयार केले जाते व त्याच्यावर आळा कसा ठेविला जातो, आणि दुसऱ्यांत आपल्या प्रचंड हिंदी साम्राज्याच्या भावी उत्कर्षासाठी ग्रेटब्रिटन व हिंदुस्थान, दोवांचे मिळून राजकीय धोरण कसे असावें, या विषयींची माहिती व चिकित्सा इतकी संकलित पण मार्मिक आहे की, त्यांच्यांतून थोडे बहुत विलग उतारे दिले तर, त्यांच्या पुर्त्या वाचनाने होणारा आनंद कमी होईल, सबब तसे करणे ठीक वाटत नाहीं परस्परांचा विचारविनिमय, समाईक वर्तन आणि एकरूपतेचे राजकीय धोरण, या बाबतीत प्राच्य व पाश्चिमात्य या दोघांच्याही समोर सकृदर्शनी एक मुख्य अडचण उभी राहते. ती ही की, या संबंधांतील शब्द व क्रिया, त्यांच्या परिस्थितींतून वेगळ्या काढल्या तर,त्या क्वचितच समानार्थद्योतक होतात. ही मुख्य व तत्त्वाची गोष्ट ग्रेट ब्रिटनचा हिंदुस्थानाशी असलेल्या संबंधाचा व त्यापासून उत्पन्न होणाऱ्या नानाविध राजकारणांचा विचार करीतांना नेहमी लक्षांत बाळगणे अवश्य आहे. इकडील लोक व चालीरीती यांविषयीं या पुस्तकांत केलेल्या सर्वोत्कृष्ट टीकेमध्ये हा प्रमुख विचार सर्वतोपरी जागरूक आहे. थोर कुळ व योग्यता अंगी असून जे आपल्या संस्थानाचे यशस्वी आधिपती आहेत, अशा उत्तम शिक्षण मिळालेल्या व उच्च कुळामध्ये जन्म झालेल्या एका हिंदुस्थानवासी ब्राम्हणाने हे पुस्तक लिहिले असल्याने त्यांच्या शब्दाला असाधारण अर्थपूर्णता व महत्त्व प्राप्त झालेले आहे. दि क्यासल, डील. ता. ४ मार्च स. १९१४. जॉर्ज हॅमिल्टन्.