पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. स्पष्ट दिसत होते. त्यांना व्यावहारिक विषयांसंबंधानें. सर्वसाधारण दिले जाणाऱ्या शिक्षणाचे प्रमाण आश्चर्यकारक होते. त्याच्या मनांत स्वदेशप्रीति, उत्तम नागरिकपणा, राजभक्ति व सेवा, यांची मूलतत्त्वे भरून दिली जात होती. तसेच त्यांचे हक्क व त्यांची कर्तव्यकर्मे यांची जाणीवही करून दिली जात होती. येथे हेही सांगितले पाहिजे की, ही शाळा साऱ्या इंग्लंडांतील नावाजलेल्या शाळांपैकीही एक असल्याबद्दल तिची प्रसिद्धि आहे. ब्रिटिश आरमारांतील लढाऊ गलबतांना नांगर टाकण्याची टार्के ही एक आवडती जागा आहे. त्याच्या खाडीत मोठमोठी लढाऊ गलबतें, क्रूझरें, बुडून चालणाऱ्या बोटी, एकेक दोनदोन दिवस पडून राहिलेल्या दिसून येतात. एकदा आम्ही 'सफोक् ' नांवाची ध्वजनौका पाहण्यास गेलो होतो. त्यावरील अडमिरल लंडनला गेलेले होते. तरी सारें गलबत आह्मांला मोठ्या सभ्य रीतीने व नीट फिरवून दाखविण्यांत आले. ते खरोखरच एक तरता जलदुर्ग होतें. आम्हीं मुंबईस — गनबोटी'-लहानशी लढाऊ गलबतें–पाहिली होती.सबब, येथील प्रकार आम्हांला अगदीच नवा होता असें नाही. आह्मीं त्यांच्यांतील निरनिराळ्या 'केबिनी' व 'सलून्स'खोल्या व दिवाणखाने-खुद्द अॅडमिरलच्या सलूनसुद्धा पाहिल्या. तसेंच तोफा व त्या किती सहजपणे सज्ज करून डागल्या जाऊं शकतात, तेंही आह्मांला दाखविण्यात आले. या तोफा पुष्क