पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- मुंदर डेव्हनमध्ये. बस्तु नव्हेत, हे पुर्तेपणी लक्षात ठेवून कोर्ट वागत होते; हे स्पष्ट दिसत होते. कोटातून आह्मी कच्च्या कैद्यांच्या कारागृहा. • कडे गेलो. तेथील व्यवस्था व सफाई हिंदुस्थानांतील मोठ्या शहरांतील तुरुंगांतल्या इतपत चांगली होती. त्यावेळी तेथे चौकशी व्हावयाचा एकच कैदी होता. त्याच्यावर एक बायको जिवंत असून दुसरी केल्याचा आरोप होता... इंग्रजी प्राथमिक शाळा मी प्रथम येथेच पाहिली. तेव्हां अंतःस्थ व्यवस्था व सामानसुमान, यांच्या संबंधांत या शाळेची स्थिति, हिंदुस्थानांतील राजकुमार कॉलेज्यांतल्यापेक्षाही चांगली होती ,असें माझ्या तात्काल नजरेस आले. मुलांना पुस्तकें, पेन्सिली, कागद, इत्यादि हव्या त्या वस्तू पुरविल्या जात होत्या. हिंदुस्थानांत या बाबतीत भारी उणीव दिसून येते. शिक्षक लोक मुलांना धडे समजावून देण्यांत विशेष काळजी व कळकळ दाखवीत होते. त्याचा माझ्या मनावर चांगला परिणाम झाला. तेथील उत्साहयुक्त व कळकळीची परिस्थिति पाहून मला चमत्कार वाटला, आणि समाधान झाले. प्रश्नांची उत्तरे देण्याची पाळी येण्याची, विद्यार्थी उत्सुकतेने वाट पहात होते. ते पाहून मला संतोष वाटला. हिंदुस्थानांत मुलांच्या मनांत पंतोजीविषयी भारी भीति असते. तिचा येथे मागमूस नव्हता, शाळेची जागा शक्य तेवढी आनंददायक व मनोहर केलेली असून, मुलांच्या उल्हसित चर्येवरून त्यांना शाळेत राहण्यांत आनंद वाटत होता, असें