पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुंदर डेव्हनमध्ये. ळच मोठ्या होत्या तरी, त्या आरमारांतील सर्वांत मोठ्या तोफांच्या निदर्शक होत्या असे नाही. तसेंच आह्मी 'हिज् म्याजेस्टजि स्टीमशिप' 'मेडस्टन' व त्याच्या पोटांतील एक 'सबमरीन'बुडून चालणारी बोट-पाहिली. आह्मीं आजवर, अलीकडील 'सबमरीन' पाहिली नव्हती.यामुळे या सफरीचे पुष्कळच कौतुक वाटले.या जहाजाचा त्याच्या पोटांतील सात 'सबमरीन'वर ताबा असून त्याच्या वरची सारी माणसें तेथे राहण्याची सोय असते. तसेंच या गलबताच्या ताब्यांत असणाऱ्या बोटींच्या दुरुस्तीला लागणाऱ्या सर्व सामानसुमानानें सज असा कारखाना या तरत्या जहाजावर असून या घातक यंत्रांना लागणारा दारूगोळा आणि सर्वांसाठी खाण्यापिण्याचे जिन्नस, यांचा भरपूर पुरवठा, केलेला असतो. यंत्रे व तत्संबंधी इतर सामान यांची 'सबमरीन' मध्ये इतकी कांहीं खेचाखेच असते की,तेथें काम करणाऱ्यांना हातपाय पसरण्यास किंवा ताठ उभे राहून चालण्यापुरतीसुद्धां जागा नसते. 'टार्पेडो' बसविण्याची व ती बाहेर उडविण्याची जागाही आह्मीं पाहिली. ती बोट पाण्यात बुडून चाललेली असतांना, दूरवरचा भाग स्पष्ट पाहतां येण्यासाठी एक दुर्बीण असते, तीही आह्मीं पाहिली. खरोखर या ठिकाणी रचनाचातुर्याने जेवढ्या ह्मणून सुधारणा आधुनिक यंत्रशास्त्रामध्ये घडवून आणलेल्या आहेत, त्या सर्व एका लहानशा बोटीत एकवटलेल्या दृष्टीस पडतात व त्यांच्या साहाय्याने समुद्रावर फिरत रहाणारे केवढेही मोठे गलबत क्षणार्धात रसातळास पोहोंचविता येते.