पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. मदत करीत होते, तेथे कांहींचीच नांवें घेणे ठीक नव्हे. तरी पण मुख्यत्वे या दोघांनी जी विशेष मदत दिली व माझ्याशी जे सौजन्याचे वर्तन केले, त्यांबद्दल त्यांचे नामनिर्देशपूर्वक, आभार न मानणे कृतज्ञतेला अनुसरून होणार नाही. 'समरी ज्यूरिस्डिक्शन' संक्षिप्त चौकशीच्या पद्धतीने निकाल करण्याचा अधिकार असलेल्या 'प्राव्हिन्शियल' कोटातील काम पाहण्याची माझी इच्छा होती. मिस्टर आल्मी यांनी मेहेरवानगी करून मला टार्के येथील 'बरो' कोटींत. नेले. तेथें 'जस्टिसेस् ऑफ धि पीस' यांच्या पुढें मुकदम्यांची सुनावणी होत होती. ते लोक धंदेवाले कायदेपंडित नसून, हिंदुस्थानांतील 'ऑनररी म्याजिस्ट्रेटा'सारखे होते. जबान्या घेणे व भानगडीच्या कायद्याच्या प्रश्नासंबंधाने न्यायाधीशांना सल्ला देणे यासाठी कोर्टात पगारी कामदार होते. म्याजिस्ट्रेटांचा कल कायदेकानूच्या क्लिष्ट कोट्या व कूट यांचा खल करण्याऐवजी, खरी हकीकत कळवून घेण्याकडे अधिक होता, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. ज्याच्यामुळे सत्यान्वेषण बहुशः कठिण होते, अशा कायद्याच्या लाक्षणिक शब्दावरच अधिक दृष्टि देण्याकडे हिंदुस्थानांतील कोटींचा झोंक असतो किंवा कसे, हे सांगण्यासारख्या स्थितीत मी नाही. येथे न्यायाधीश, वकील व साक्षीदार यांचा प्रयत्न, घडलेल्या गोष्टीची खरी. माहिती मिळविण्याचाच दिसत होता. आणि कायद्यांतील तजविजी म्हणजे सत्यान्वेषणाचे साधन आहेत, त्याच साध्या,