पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुंदर डेव्हनमध्ये. थोडेच दिवस राहिलो. तेवढ्यांतसुद्धां, सर्व त-हेने मदत देण्याला तयार अशा पुष्कळशा सद्गृहस्थांचा सुदैवाने मला परिचय झाला. तेथील ' असिस्टंट टौन क्लार्क' व सॉलिसिटर मिस्टर आल्मी हे माझ्याशी विशेष सौजन्याने वागले. इंग्लंड व हिंदुस्थान यांच्या संबंधी अनेक विचारार्ह विषयांवर भाषण करीत मी त्यांच्याबरोबर अनेकदां तिसरे प्रहरचा वेळ मजेनें घालविला. 'बरो'च्या स्थानिक कामाकाजाच्या व्यवस्थेसंबंधानें पक्कीशी माहिती हवी असल्याचे मी त्यांना कळविले, तसे त्यांनी त्याबद्दलचा तपशीलवार गोषवाराटाइपांनी लिहिलेला–मजकडे पाठविण्याची तसदी घेतली. टार्के येथे आमचे दिवस आनंदांत व उपयुक्त माहिती मिळविण्यांत जावे, याविषयी त्यांनी शक्य तितकी तजवीज केली. त्यांच्या या साऱ्या परिश्रमांबद्दल मी येथे त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच या बाबतीत मी ज्या दुसऱ्या एका गृहस्थाचा ऋणी आहे, त्याचे नांव मिस्तर रॉबर्ट्स हे होय. त्यांनी कृपा करून मला तेथील एका शाळेत नेले. तेथे आमचा काळ फारच मजेत व फायद्याचा गेला. इकडील प्राथमिक शाळेतील शिक्षणक्रमाची व्यवस्था तेथे त्यांनी मला समजावून दिली व तेथे विद्यार्थी उपयोगांत आणीत असलेल्यापैकी काही पुस्तकें,शिक्षणक्रमाच्या नमुन्यादाखल, त्यांनी मला देऊन, स्वतःला असलेली व प्राप्त होण्याजोगी सारी माहितीही मिळवून दिली. या त्यांच्या मदतीचे मला फार महत्त्व वाटते. सर्वच प्रेमाने वागून १४३