पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. आली आहे. येथील पुस्तकालयाची टापटीप व व्यवस्था फार चांगली आहे. ती पाहून माझ्या मनावर भारी चांगला परिणाम झाला. तेथील पुस्तकें 'कार्ड क्याटलाग'च्या त-हेवर, सोईवार, व्यवस्थित व सुरेख रीतीने लावून ठेवलेली आहेत. वर्तमानपत्रे ठेवण्याची मेजें उपयोग करणाऱ्यांना फार सोईची पडतात. अशा संस्थांची आवश्यकता हिंदुस्थानांतील लक्ष्मीपुत्रांच्या लक्षांत भरून, त्यांनी आपल्या औदार्याचा ओघ देवालये, घाट, अन्नछत्रे, यांच्याकडून फिरवून, अशा संस्थांकडे वळविला असता, तर आज आम्हां हिंदी लोकांनाही अशा पुस्तकालयांसंबंधानें फुशारकी मारतां आली असती. देवालये, घाट वगैरेंचाही आपआपल्यापरी पुस्तकालयांइतकाच उपयोग आहे, नाही असें नाहीं. ऐहिक धर्मकृत्यांच्या कामी हिंदुस्थान पूर्वीपासून मागसलेलें होतें व आहे. पण हल्ली अशी वेळ आली आहे की, श्रीमान् लोकांचे औदार्य व सार्वजनिक हितासंबंधाची कळकळ यांच्यावर अशा प्रकारच्या शारीरिक व मानसिक उन्नति देणाऱ्या संस्थांचा दिवसेंदिवस अधिक हक्क पोंचत जावा, असें माझें आग्रहाचे झणणे आहे. माझ्या या सफरीमध्ये मला सर्व त-हेचे साहाय्य करण्याला तयार व उत्सुक असे पुष्कळ गृहस्थ मिळत गेले, ही या माझ्या प्रवासांतील इतर अशाच आनंददायक अनुभवांपैकी एक गोष्ट होय. परकी गृहस्थांना लागेल ती माहिती व मदत देण्याला, ते लोक तयार व उत्सुक असत. मी टार्के येथे १४२