पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुंदर डेव्हनमध्ये. आलेल्या नृत्यगायनपटु ' स्टार्स ' चे-तारागणांचे-जलसे वरचेवर होतात, व नाटकगृहांमध्ये सुप्रसिद्ध नाटकमंडळीकडून अगदी नव्या नव्या नाटकांचे प्रयोग केले जातात. ज्यांना स्वस्थपणा हवा, अशा शांत स्वभावाच्या मंडळीला मनोरंजन व ज्ञानप्राप्ति होण्याला येथील पदार्थसंग्रहालय चांगले साधन आहे. त्याच्यांत पुष्कळशा वस्तू व्यवस्थित रीतीने मांडून ठेविलेल्या आहेत. त्यांमध्ये केंटमधील गुंफेत सांपडलेले 'फॉसिल्स'-अतिशय प्राचीन काळच्या प्राण्यांचे अश्मसार झालेले अवशेष-वगैरेही आहेत. तळमजल्यावर 'टार्के न्याचरल हिस्टरी सोसायटी'चे आफिस आणि लायब्ररी, ही आहेत. इंग्लडामध्ये लहानसहान गांवांतून सुद्धां पुस्तकालये व पदार्थसंग्रहालये आहेत, हे लक्षात ठेवण्याजोगे आहे. प्राचीनवस्तुविषयकज्ञानप्राप्तीसंबंधाने महत्त्वाच्या वस्तु जमवून, त्यांचे प्रदर्शन, त्यांच्या द्वारे स्थानिक ऐतिहासिक ज्ञानाचे संरक्षण, व त्याबरोबरच त्यांच्या विषयी सार्वजनिक लोकमत व अभिरुचि यांना उत्तेजन देणे, या गोष्टींना अशा पदार्थ व पुस्तकसंग्रहालयांच्या द्वारे चांगली सवड होते. मिस्टर अँड कार्नेजी या कोट्याधीश गृहस्थाच्या औदार्याने पुष्कळचशा गांवांना सुरेखशी पुस्तकालये मोफत मिळाली आहेत. त्यांतच ही उदार देणगी टार्केच्या वाट्यालाही १४१