पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. रम्य स्थळ ! तेथें राहणे आपल्याला भारी प्रिय व आनंदाचे वाटेल.' असे उद्गार काढले होते, असे सांगतात. हे शहर अलीकडेच वाढलेले असून नाजूक प्रकृतीच्या लोकांना राहण्याला ते फार पसंत आहे. कारण, तेथील हवापाणी सौम्य व आरोग्यप्रद आहे.हिवाळ्यांत उष्णतेचे मान ३६ अंशांखाली जात नाही व उन्हाळ्यांत उष्णतेचे मान कचितच ७७° अशांवर चढते. समुद्रकाठची हवा खाण्याची जागा, व हिंदुस्थानांत उन्हाळ्यांत पहाडावर थंड हवेत जाऊन राहण्या ची स्थळे, या दोन्ही ठिकाणचे फायदे येथे एकत्र आढळतात. टार्के शहराची मांडणी मोठी मनोहर आहे. तेथे पुष्कळ सुंदर उपवनें असून त्यांतील मार्ग वृक्षच्छायेने आच्छादित ओहत. तसेच या बागांमध्ये चित्रविचित्र कुंड्या असून श्रांत मंडळीसाठी बैठकीही ठेवलेल्या आहेत.ऐन समुद्रकाठी असलेल्या कड्याच्या पायथ्याशी एक उतारबंद मनोहर बगीचा आहे. तेथून समुद्राचा देखावा फारच शानदार दिसतो. आणि शांतपणे मनन करीत बसण्याला व कल्पनातुरंगांना मनसोक्त विहार करूं देण्याला येथे उत्तम सोय आहे. तसेच तेथून खालच्या बाजूला रमणीय राजपथावर क्रीडा करणाऱ्या उल्हसित जनसमूहाचे स्वैरसंचार पाहण्याला सांपडतात. बंदरामध्ये किती तरी निरनिराळ्या त-हेची तारवें दृष्टीस पडतात. तसेच येथे दुसरें एक विशेष रमणीय असें स्थळ समुद्रतीरावर उत्तम जागी बांधलेले सुंदर क्रीडागृह हे होय. तेथे उत्तमोत्तम ह्मणून प्रसिद्धीस