पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुंदर डेव्हनमध्ये. कोंदणांत जडलेल्या रत्नांसारख्या उपवनवाटिका व वसतिगृहें, आणि या सर्वांवर ताण करणारे समुद्र व आकाश यांचे अप्रतिम व अवर्णनीय वर्णवैचित्र्य, या सर्वांपासून माझ्या मनावर सृष्टिदेवतेच्या अद्वितीय रचनाचातुर्यासंबंधाने तत्काळ व उत्कृष्ट परिणाम झाला. __मी या विस्तीर्ण व उल्हासजनक देखाव्याचे निरीक्षण करीत होतो. पक्षिगणाच्या मधुर गीतांच्या ध्वनीची बहार माझ्या कानांवर पडत होती, त्यांना हे स्थळ प्रतिनंदनवनच भासत असावे, त्यावेळी माझ्या मनाने आपोआप माझ्या स्वदेशाकडे भरारी मारली. मला माझ्या संस्थानांतील 'हिलस्टेशन'उष्णकाळामधील हवा खाण्याच्या डोंगरावरील स्थळा-चें स्मरण देणारे असे सर्व इंग्लंडांत हे एकच ठिकाण होय. रस्किनने टार्के व आसपासचा भाग झणजे, इंग्लंडांतील इटली, असे झटले आहे. व टेनिसनने त्याचे अंतःकरणपूर्वक गोडवे गाइले आहेत. पण टार्केच्या सौंदर्याच्या संबंधाने त्यास देण्यात आलेल्या साऱ्या शिफारसपत्रांपैकी एकही नेपोलियनने मनःपूर्वक काढलेल्या उद्गाराची बरोबरी करीत नाही. जे इंग्लंड पादाक्रांत करण्याची त्याची उमेद होती त्या देशांतील भूमीचे प्रथमदर्शन नेपोलियन यास झालें तें तो 'बेलारोफोन' जहाजावर कैदी असतांना याच भागाचे होय. टार्केचे हिरवेगार उतार या बंदिवान झालेल्या जुलमी राजाने आपल्या तीक्ष्ण दृष्टीने न्याहाळून पाहात 'वाः, किती तरी शानदार व १३९