पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग बारावा. सुंदर ‘डेन्हन' मध्ये ब्रिटिश बेटांतील इतर थोड्याच शहरांमध्ये टार्केपेक्षा जास्त मोहकपणा आढळून येतो. साऱ्या इंग्लंडामध्ये पुष्कळचशा बाबतीत त्याची बरोबरी करणारे असें कांहीं नाही. डेव्हनशायरच्या किनाऱ्यावर दूर आंत गेलेल्या अनेक खाड्या आहेत. त्यांत विशेष आंत घुसलेल्या अशा एका खाडीवर अगदी टोकाला हे शहर झोंकदार बसलेले असून, तेथें तें चित्रासारखें सुंदर दिसते. उष्ण कटिबंधाकडून येणारा गरम वारा, अफाट अशा अटलांटिक महासागरावरून त्याच्यावर वाहात असतो. आणि या ठिकाणी वाढणाऱ्या उष्ण कटिबंधांतील वनस्पतीवरून तेथील हवेचा सौम्यपणा व निरोगीपणा व्यक्त होतो. जवळचे आरक्तवर्ण भव्य पंवतभाग, समुद्रकांठची शानदार व विस्तीर्ण वाळवंटें, सुवर्णवर्ण सूर्यप्रकाशाने प्रकाशित अशा पांढऱ्या शुभ्र गच्च्यांचे सौंदर्य, मनोहर टेकडीच्या चकचकीत व हिरव्यागार अशा उतारावर १३८