पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केंब्रिज व श्रीमान् लोकांची एक हवेली. ळशी प्राचीन, श्रीमान् व वजनदार घराणी कायम राहती. . माझ्या सफरीमध्ये इतकी काही ऐतिहासिक दृष्टया महत्त्वाची व शेकडो वर्षांची जुनी घराणी माझ्या पाहण्यांत आली की, यासंबंधांत तिकडील घराणदार व सरदार मंडळीचा मला हेवा वाढू लागला. या पाश्चात्य दिग्भागांत येण्यापूर्वी काही इंग्रजी चालीरीतींविषयी मला विशेष आदर वाटत नव्हता. पण त्यांच्या स्वाभाविक परिस्थितीमध्ये त्यांचा निकट परिचय झाल्यापासून मला त्या जास्त चांगल्या रीतीने समजल्या व त्यांचे महत्त्व आणि उपयोग कळून येऊ लागले आहेत.