पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या सुप्रसिद्ध राज्यकार्यकुशल मंडळीच्या अनुभवाच्या फायद्याला हिंदुस्थान देश मुकतो. ते नोकरी सोडल्यावर सुद्धा, हुकुमत चालविलेल्या व अनुभव मिळविलेल्या देशांतच कायम राहात गेले तर त्या देशाला त्यांच्या अनुभवाचा लाभ खचित मिळेल. ही एक उणीव-आणि मला वाटते अपरिहार्य उणीव-आहे. जेथील राज्यव्यवस्थेमध्ये वरिष्ट अधि. कारी मंडळी जगाच्या एका भागांतून दुसऱ्या दूर जागी न्यावी लागते, तेथे ही उणीव दूर होणे शक्य नाही. हिंदुस्थानांत मोठमोठी हुद्द्याची कामें केलेल्या बड्या युरोपियन अंमलदारांपैकी बहुतेकांना राहिलेले आयुष्य त्यांच्या जन्मभुमीमध्ये न घालवितां येण्याची सुसाध्य अशी एखादी युक्ति मला तरी आढळत नाही. धार्मिक शिक्षणापासून अगदी फारकत झालेल्या अशा राष्ट्रीय शिक्षणपद्धतीच्या संबंधाने बाबासाहेबांची मते, या देशांतील शिक्षणविषयावर ठाम मत देण्याला समर्थ, अशा बहुतेक गृहस्थांच्या विचाराहन भिन्न नाहींत.ते ह्मणतात, “आमच्या मुलांना दिले जाणाऱ्या शिक्षणाने त्यांच्या अंतःकरणांत धर्माविषयी व आपल्या परंपरेविषयी आदर राहात नाही. हा जो अनिष्ट परिणाम होत आहे त्याकडे आमचे लक्ष अधिकाधिक तिरस्कारबुद्धीने वेधले जात आहे. अलीकडे हिंदुस्थानांत घडून आलेले अत्याचार बऱ्याच अशी शिक्षण व धर्म यांच्यामधील फारकतीचेच प्रत्यक्ष परिणाम होत. मुलांना परमेश्वराचं भय बाळगण्याचे शिक्षणच मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या मनांतून धार्मिक, राजकीय अथवा सामाजिक सत्तेविषयी आदर व पूज्यभाव अगदीच नष्ट झालेले असतात ! धार्मिक शिक्षणाविषयीं हिंदुस्थान सरकारचे धोरण उघड उघड सतत तटस्थ वृत्तीचे असल्याने शिक्षणक्रमामध्ये धार्मिक तत्त्वांचा अभाव प्रादुर्भत झालेला आहे. सर्व देशभर हिंदी मुलांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणक्रमामध्ये धार्मिक शिक्षणाचा थोडाबहुत तरी अवश्यमेव अंतर्भाव सरकाराकडून झाल्याशिवाय, या बाबतीत खासगी प्रयत्नापासून ह्मणण्यासारखी फलनिष्पत्ति होईल असे मला वाटत नाही."