पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. चाढती कुंपणे नाहीत, त्या ठिकाणी त्यांच्याऐवजी नुसत्या दगडांचे गराडे घालतात. घोडे व इतर जनावरें, शेतामध्ये अगदी मोकळेपणीं चरत असतात, यामुळे कुंपणे व 'स्टाईल्स'कुंपणावरून येण्याजाण्याचे लांकडी मार्ग-यांची आवश्यकता असते. हिंदुस्थानांतील जमिनीची इतकी किंमत असती, किंवा शेतकरी व जमीनदार इकडच्याप्रमाणे आपल्या मिळकतीची काळजी घेणारे असते तर हीच तन्हा तिकडेही हल्लीपेक्षा अधिक प्रचारांत आली असती. विलायतेतील कांहीं थार व ऐतिहासिक घराण्यांशी माझा जो सहवास घडला, तेव्हांपासून वडिलार्जित स्थावर मिळकतीचे हिस्से होण्याची हिंदुस्थानांत कायद्याने सवड ठेविली आहे, याच्या विरुद्ध माझा ग्रह असलेला दृढतर झाला आहे. राज्याचे ( संस्थानाचे ) हिस्से सरकार होऊ देत नाही, हे खरे. पण या वर्गात येणारी घराणी फारच थोडी. 'एन्टेल' किंवा मिळकत वारसा हक्काने जाण्याबद्दलचा कायद्याचा नियम व तदनुरूप व्यवस्था व वहिवाट पूर्वीपासून तिकडेही चालू असती तर, मुबलक सामानसुमानाने सजविलेल्या अशा इतिहासप्रसिद्ध हवेल्या आणि पूर्वजांच्या तसबिरी व कुटुंबांतील परंपरागत व अमोल वस्तूंचे संग्रह असणाऱ्या जमीनदारीवरील घरांनी युक्त अशा मोठमोठ्या स्थावर मिळकतींची वाढ आमच्यांतही झाली असती. इतकेच नव्हे तर, आमच्या देशांतही -सरकारच्या व जनतेच्या सेवेला उपयोगी पडणारी अशी पुष्क १३६