पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कब्रिज व श्रीमान् लोकांची एक हवेली. लॉर्ड आयव्हे यांनी कृपा करून आमाला सर्व महाल व बागबगीचा वगैरे नीट फिरून दाखविण्यासाठी आपल्या सेक्रेटरीला सांगितले होते.त्यांनी व त्यांच्या मनोहर कुटुंबाने आमाला सर्व त-हेनें आराम मिळण्याविषयी तसदी घेतली, आणि हा भव्य महाल व आसपासचा भाग यांचे फोटो दिले. या सफरीपासून आझांला अधिक आनंद वाटला; आणि माझे मित्र व सोबती क्याप्टन् ल्यांग यांच्या लेडी आयव्हे या आप्त असल्याच्या योगाने या ठिकाणी आम्ही जे काही पाहिले त्यापासून आमच्या अंतःकरणांत एक प्रकारच्या अभिमानाची स्फुर्तीही उत्पन्न झाली. - या व अशाच इतर भागांत मी बऱ्याचशा सफरी केल्या व फिरलो. त्यांच्यांत विलायतेंतील बहुतेक जमीन खाजगी लोकांच्या मालकीची आहे, सरकारची नव्हे, ही गोष्ट माझ्या मनांत विशेष ठसली. हिंदुस्थानांतील बहुतेक भागांत याच्या उलट स्थिति आहे. इकडे या जमीनीच्या प्रत्येक तुकड्याभोंवतीं, बहुतकरून मालकांनी कुंपण घातलेले असते. गांवच्या लोकांना खेळण्याकरितां व आराम घेण्यासाठी उपयोगांत येणारी गांवठाणाची जमीन सुद्धां, गांवच्या लोकांच्या मालकीची असते. शेतीलायक जमिनीचा एवढासा तुकडा. सुद्धा कुंपणाशिवाय सांपडत नाही. खेड्यापाड्यांतील प्रत्येक गल्लीच्या दोन्ही बाजूला हिरवीगार कुंपणे लागतात. तीही ध्यानांत ठेवण्याजोगी आहेत. ज्या ठिकाणी अशा प्रकारची