पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. दुर्मिळ व मौल्यवान कारागिरीच्या वस्तूंचा संग्रह करण्याचा मोठा शोक आहे. लडंनमधील त्यांचा वाडाही आह्मीं जाऊन पाहिला. त्यांत देखील प्राचीन चित्रकलापटूंच्या हातच्या काही अत्युत्तम तसबिरी व चित्रे आहेत. एव्ह्डन येथील लायब्ररीमधील ग्रंथसग्रंह मोठा व सुरेखसा आहे. तेथील पाकशाळा, नोकरांच्या जागा व मद्य ठेवण्याची तळघरेही आह्मीं पाहिली. या इमारतींतील सामानसुमानाची मांडणावळ प्रशंसा करण्यासारखी असून तिची शृंगाररचना फार चतुराईने केलेली आहे. इकडील पुष्कळ सुरेख व शानदार इमारती मी पाहिल्या; पण या हवेलीच्या मालकाने तेथें एक नवा व मोठा दिवाणखाना बांधविला आहे, त्याच्यांत उभा असतांना, माझ्या मनावर जसा परिणाम झाला, तसा इतर कोठेही झाला नाही. त्या दिवाणखान्याचे काम शुद्ध संगमरवराचे व फारच नामी असून त्याच्यांत मला हिंदी व मुसलमानी अशा दोन्ही त-हेच्या शिल्पकलेची बरीच झाक मिसळलेली आहे असे वाटले, व आपण विलायतेंत नसून, आग्रा किंवा अहमदाबाद, येथील एखाद्या भव्य व बादशाही महालामध्ये आहों, अशी कल्पना सहज करता येती. या महालाची बांधणूक, त्या दोन्ही शहरांतील प्राचीन इमारातींचे नमुन्यावरच रचलेली वाटते. कारण, तिच्यांत अहमदाबाद येथील बारीक व नाजूक कोरीव काम आणि आग्रा येथील भव्य व उठावदार काम, या दोहोंचाही सुरेख मिलाफ झालेला दिसतो. १३४