पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केंब्रिज व श्रीमान् लोकांची एक हवेली. होती.लॉर्ड व लेडी आयव्हे यांच्या आदरपूर्वक निमंत्रणावरून त्यांची ' एल्व्ह्डन हॉल' नावाची हवेली पाहून येण्याची आम्हांला संधी मिळाली. हे ठिकाण थेटफर्ड जवळ असून केंब्रिजपासून अदमासे तीस मैलांबर, आहे. ते मूळ पंजाबचे महाराज रणजीत सिंग, यांचे चिरंजीव महाराज धुलीपसिंग, यांच्यासाठी सरकाराने विकत घेतले होते. पुढे लार्ड आयव्हे यांनी ती हवेली विकत घेतली. त्याच्या भोवती एक मनोहर राई व जंगल असून, तेथील रानांत शिकारी सावजांचा पुष्कळसा भरणा आहे. या मिळकतीचा विस्तार बराच मोठा आहे. तिच्यांत तीन खेडी व पुष्कळशा शेतवाड्या आहेत. तेथील बागबगीचे फार शानदार व चतुराईने तक्ते पाडून लावलेले आहेत. त्यांतील फुले उमललेली असतांना त्यांचा देखावा फारच मजेदार व सुंदर दिसतो. तेथे जणों उत्तमोत्तम व गहिन्या रंगाचे झुबके किंवा पुंजच लागलेले भासतात. तेथें पक्षिगृह आहे तें, साऱ्या विलायतेमधील सुप्रसिद्ध खाजगी पक्षिगृहांपैकी एक ह्मणून नावाजलेले आहे. तसेंच तेथे पृष्ठभागावर — वॉटर लिलीज'-प्रफुल्ल कुमुदिनीतरंगत असलेले एक सरोवर असून, ते या महालाच्या आसमंतांतल्या भूभागामध्ये एक फारच रमणीय भाग आहे. ही हवेली फार मोठी आहे. तेथे उत्तमोत्तम तसबिरी व चित्रं यांचा भारी मोठा संग्रह आहे. त्यांच्या किमतीच्या मानाने तो एक निधीच समजला पाहिजे. लॉर्ड आयव्हे यांना हरत-हेच्या १३३