पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. 'ट्यूटर्स'-उपशिक्षकांनी शिफारस केलेल्या व्याख्यानालाच जातात. आम्ही गेलो तेव्हां 'लाँग व्हेकेशन'-मोठी सुट्टीअसल्यामुळे कॉलेजें बंद होती.तरी पण तेथे जे काही पाहण्यांत आले, त्याने मला फार आनंद झाला. तेथील राहणीविषयी मी पूर्वीच जे काही ऐकिलें व वाचले होते, त्यावरून मला तेथील आयुष्यक्रमाची चांगली कल्पना आली. मिस्टर बेनियन्स यांनी तसदी घेऊन मला तेथील 'युनिव्हर्सिर्टी लायब्ररी'ही दाखविली. ती फार मोठी असून, तिच्यांत सर्व विषयांवरील पुस्तकांचा मोठाच भरणा आहे. . - एका लहानशा बोटीमध्ये बसून, आम्ही स्वस्थपणे क्याम नदीवर गमतीने फिरून आलो.तिच्या त्या दोहों बाजूच्या चित्रविचित्र तीरांमधील संथ पात्रावर आम्ही चाललो होतो, तो प्रसंग आम्हांला फारच मनोहर वाटत होता. एकीकडे हिरवीं चार शेते, व दुसऱ्या तीरावर भव्य इमारती असून या दोहोंना जोडणारे असे मध्यंतरी सुंदर व लहान लहान पूल लागले. या भागांत ही नदी फारच रम्य वाटते. या नदीचे पात्र जरी अगदी उथळ असले तरी, 'लाक्स'-पात्रांतील उंचसखल भांगांतून खाली वर जातां येण्यासाठी केलेल्या पाण्याच्या कवाडदार खोल्या आणि 'वेअर्स ' बांध-यांच्या योगाने, लहान लहान होड्यांना सुद्धां, त्यांतून प्रशस्तपणे फिरण्याची सोई केलेली आहे. इंग्लंडांतील एखादा 'कंटी मॅन्शन्' किंवा श्रीमान् व सरदार लोकांच्या जमीनदारीवरील हवेली पाहण्याची मला फार इच्छा १३२