पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केंब्रिज व श्रीमान् लोकांची एक हवेली. त्यांच्यांतून तयार होऊन निघालेल्या शेकडो विद्वान् व विख्यात गृहस्थांनी, इंग्लंडालाच काय, पण साऱ्या जगताला शोभा आणलेली आहे. अशी ही कॉलेजें प्रत्यक्ष पाहण्याचा प्रसंग मला फारच आनंदाचा वाटला. प्रत्येक कॉलेजाला स्वतंत्र क्रीडाभुवनें व मैदाने आहेत. त्यांच्यांत जागजागी मोठमोठे व शानदार वृक्ष लागलेले आहेत. त्यामुळे तेथील देखावा फार रमणीय वाटतो. प्रत्येक विद्यार्थ्याला पृथक् कोठड्या मिळतात. त्या फारच शानदार व आरामाच्या असतात. त्या डामरथ् येथील 'रॉयल नेव्हल कॉलेज' किंवा क्यांबलें येथील ' सांडहर्स्ट कॉलेजां'तल्या पेक्षां पुष्कळ चांगल्या आहेत. हिंदुस्थानांत मुंबईसारख्या शहरांत राहणाऱ्या वाढत्या अमलदाराला सुद्धा त्या सुखाच्या व सोईच्या वाटतील. त्यांची तन्हा हिंदुस्थानांतील मध्यम स्थितींतल्या लोकांच्या शक्तीबाहेर आहे. केंब्रिज येथील कॉलेजांतला विद्यार्थी होणे ह्मणजे, त्या विवक्षित कॉलेजांत, राहण्याची जागा व खाण्यापिण्याची सोय होणे, आणि केंब्रिज येथील शिक्षण देणाऱ्या युनिव्हर्सिटीचा एक मेंबर-सभासद होणे, इतकेच. ती युनिव्हर्सिटी, निरनिराळ्या फ्याकल्टी-विषयां-वर व्याख्याने देवविण्याची तजवीज करिते. सर्व कॉलेजांतील विद्यार्थी एकत्र जमून, आपणाला हव्या त्या त्या व्याख्यानमालेतील व्याख्याने ऐकतात. प्रत्येक व्याख्यानाची पृथक् पृथक् फी ठरलेली आहे. विद्यार्थी आपापल्या १३१