पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग अकरावा. केंब्रिज व एक 'कंट्री मॅनशन्' किंवा सरदार व श्रीमान् लोकांची त्यांच्या जमीनदारीवरील एक हवेली. 'इंडिया आफिसा'ने मेहेरबानी करून मिस्टर ई.ए. बेनियन्स, 'सेंट जॉन्स कालज' चे 'फेलो' आणि हिंदी विद्यार्थ्यांचे स्थानिक सल्लागार, यांच्या मार्फत आह्मांला 'केंब्रिज' येथील प्रमुख संस्था पाहतां येण्याची व्यवस्था करविली होती. 'आक्सफर्ड' प्रमाणेच तेथील कॉलेजांनाही पुष्कळशा स्थावर देणग्या-हिंदुस्थानांत देवस्थानांना संस्थापकांनी दिलेल्या असतात त्याप्रमाणे-मिळालेल्या आहेत. त्यामुळे या कॉलेजांना चांगला स्थायिकपणा येऊन, स्वावलंबी व स्वतंत्र होतां येते. मिस्टर बोनयन्स यांनी कृपा करून आमच्या बरोबर फिरून या युनिव्हर्सिटीतील प्रेक्षणीय स्थळे वगैरे दाखविली.. प्रत्येक कॉलेजामध्ये पृथक् पृथक् प्रार्थनागृह असल्याचे आमच्या निदर्शनास आले. ही कॉलेजें आज किती तरी शतकें सारखी चालत आलेली, त्यांच्या भोवती पुष्कळच उत्तमोत्तम व यशस्कर दंतकथा जुळलेल्या. त्यांची योग्यता केवढी तरी.. १३०