पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पार्लमेंट-सभागृहें. असते. उन्हाळ्यांत दिनमान वाढलेलें, हवेत उष्णता आलेली, व अप्रतिम 'स्ट्राबेरी' फळांचा सुकाळ, अशा वेळी हे 'सीझन'चे दिवस ऐन बहारीला पोहोचलेले असतात. तेव्हां अत्यंत नाजूक, सुरेख व प्रेक्षणीय कपडे केलेल्या सुंदर व तरुण सभ्य रमणींनी हा रमणीय गच्चीचा भाग, गजबजलेला असतो. त्या तेथे सभासद मंडळीबरोबर तिसरे प्रहरचा चहा घेतात. तेथून जवळच वहात असलेल्या टेम्स नदीचा उत्कृष्ट देखावा दिसत असतो. या सुप्रसिद्ध जलमार्गाने जाणाऱ्या आगबोटींमुळे त्या देखाव्यांत सुरेखसें चांचल्य येत असते. त्यांतच भव्य व प्रचंड अशा 'वेस्टमिन्स्टर'. च्या पुलावरून चाललेल्या लंडनच्या अखंड रहदारीच्या मधुर ध्वनीच्या लहरी, ग्रीष्मवायूच्या मंदप्रवाहाबरोबर येत असलेल्या, एखाद्या मोठ्या धबधब्याच्या दुरून ऐकू येणाऱ्या प्रचंड व गंभीर नादाप्रमाणे कर्णविवरावर आघात करीत असतात.