पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. रणे माजली होती. राष्ट्रीय भवितव्यतेवर परिणाम करणारे असे महत्त्वाचे प्रश्न वादविवादाच्या पारड्यांत लोंबत असतांना त्यासंबंधाची अनेक वादविवादात्मक द्वंद्वयुद्धे ज्या ठिकाणी झाली त्यांचे स्मरण देणारे असे हे विलक्षण मेज आहे. - येथे प्रशस्त व उत्तम सजविलेल्या 'टी रूम्स'-चहा घेण्याचे कमरे-आहेत. ' हौस आफ कॉमन्स' मध्ये निस्सत्व वादविवाद व भाषणे चालू लागली असतांना, लॉर्ड बीकन्सफील्ड यांनी आपल्या एका कादंबरीत व्याजोक्तीने लिहिल्याप्रमाणे, 'विशी ' बोलण्याला उभा आहे व 'वाशी' बोलणे संपवून बसला आहे; किंवा एक राजश्री आपले कंटाळवाणे भाषण आटपून दुसरे तसलेच राजश्री आपली टकळी सुरू करण्याला उभे आहेत; अशा स्थितीत, कंटाळ्याचा व आळसाचा वेळ काढण्याला, हे चहा घेण्याचे कमरे उत्तम साधन आहेत. येथे अगदी आधुनिक त-हेची स्नान- - गृहे आहेत. त्यांच्यांत थंड व गरम पाण्याच्या तोटया आहेत. तसेंच चांगल्या पाकशाळा व प्रशस्त भोजनशाळाही आहेत. मेंबर लोकांसाठी येथे इतक्या व अशा काही उत्तम सोई केलेल्या आहेत की, त्यांच्यावरून ' ब्रिटिश पार्लमेंट' ह्मणजे युरोपांतील एक अत्युत्कृष्ट क्लब, अशी फारां दिवसांपासून तिची ख्याति आहे. येथील विस्तीर्ण : टेरेस ' किंवा गच्ची सीझन' मध्ये समाजातील प्रमुख स्त्रीपुरुषांचे आवडते व रम्य स्थान १२८