पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पार्लमेंट-सभागृहें. एक महत्त्वाचे खाते आहे.ती जणों सर्व सभासदांची अड्डयाचीबैठकीची-जागा आहे. तेथे ते खाजगी रीतीने एकत्र जमून, आपसांत राज्यकारभारासंबंधी प्रश्नांचा खल करितात, परस्परांची राजकीय बाबतींतील हृद्गते समजून घेतात. आणि दोन्ही पार्टीचे व्हिप्स-नियंते-आपापल्या पक्षाची मतें टांचून ठेवतात. __पार्लमेंटची बैठक संपेतोपर्यंत हे दोन्ही पक्षांचे नियंते आपापल्या पक्षाच्या हितसंबंधांच्या कामी अत्यंत दक्ष असून ते त्यांचे संरक्षण अतिशय जागरूकपणे करितात; आणि आणीबाणीच्या प्रसंगी सभा बरखास्त होईपर्यंत कोणाही सभासदाला जातां येत नाही. कारण, अशा वेळी प्रत्येकाच्या -मताची जरूर लागतेच. या ठिकाणी प्रशस्त व भरपूर पुस्तकसंग्रह असलेल्या लायबऱ्या आहेत. त्याचप्रमाणे बोळाच्या वाटा असून त्यांत कुलुपें लावण्याजोगे खाने आहेत. त्यांच्यांत प्रत्येक सभासदाला कागदपत्र सुरक्षित ठेवता येतात. मोठ्या वस्तूसंबंधांत अमेरिकन लोकांच्या कल्पना व तजविजी तशाच भारी प्रमाणावर असावयाच्या. तदनुरूप युनायटेड स्टेट्सच्या 'सेनेट' मध्ये प्रत्येक मेंबरासाठी स्वतंत्र कोठडी दिली आहे, ह्मणे. येथील एका लायब्ररीमध्ये एक ओक लांकडाचे जुनें मेज मला दाखविण्यांत आले. तें पूर्वीच्या ' हौस ऑफ कामन्स'मध्ये होते. त्याच्या सभोंवतीं पूर्वी पार्लमेंटांतली महत्त्वाची वाग्युद्धात्मक १२७