पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विशेष अनुकूल आहे असें नाहीं. 'मान उघडी, चालण्यास अवघड पडते इतक्या कमी झोळाचा झगा, उभा चिरलेला व बाजू खुल्या असल्यामुळे अंगाबरोबरच्या आंतील कपड्याची तन्हा स्पष्ट दाखविणारा पोषाख'-याविषयी त्यांनी 'या गोष्टी खरोखरच अप्रशस्तपणा व वैलक्षण्य यांच्या कळस होत,' अशी टीका केली आहे. स्त्रियांच्या पोषाखांमध्ये दिसून येणारा पोरकटपणा व असभ्यपणा नापसंत असणाऱ्या सर्व लोकांना ही टीका मान्य होईल. समाजांत वरिष्ठ दास जाण्याची हांव धरणाऱ्या लोकांची महत्त्वाकांक्षा, तसेंच आपणापेक्षा वरिष्ट दर्जाच्या लोकांचे अनुकरण करणाऱ्या, आणि नसता डौल आणून व मोठ्या लोकांचे दासवत् अनुकरण करून, आपल्या खऱ्या स्थितीबद्दल लोकांवर खोटा ग्रह' उत्पन्न करणाऱ्या कित्येक लब्धप्रतिष्ठित लोकांचा वेडगळपणा या गोष्टीही त्यांच्या टीकेस पात्र झाल्या आहेत. आंग्लोइंडियन कामगार इंग्लंडांतल्यापेक्षा हिंदुस्थानामध्ये अधिक डामडौलाने राहतात, असें हिंदी लोक आग्रहाने व नेहमी ह्मणतात ते अयथार्थ आहे, असे त्यांचे ह्मणणे आहे. उलट पक्षी हिंदुस्थानांत नोकरी पतकरून राहण्यांत, या लोकांना तिकडे मिळ. णाऱ्या सुखापेक्षां बऱ्याच सुखासमाधानाच्या गोष्टींचा त्याग करावा लागतो, असेही त्यांनी स्पष्ट झटले आहे. एका गोष्टीविषयी त्यांनी जी तक्रार अथवा जो खेद प्रदर्शित केला आहे. त्याविषयी सर्वांना सहानुभूतीच वाटेल, असे मला वाटते. मोठमोठ्या हुद्द्यावर असलेले आंग्लोइंडियन कामगार हिंदुस्थानांत कामावर असतांना त्यांनी मिळविलेल्या बिनमोल अनुभवाचा साऱ्या देशाला अत्युत्कृष्ट लाभ होतो, हे त्यांनी स्पष्टपणे कबूल केले आहे. पण त्याबरोबरच त्या लोकांची नोकरी पुरी होतांच बहुतेक सर्व अधिकारी आपल्या साऱ्या अनुभवासह विलायतेस परत जातात. यामुळे